ETV Bharat / politics

इंदापूरमध्येच हर्षवर्धन पाटील यांना वाटते सुरक्षेची चिंता; थेट देवेंद्र फडणवीस यांना घातलं साकडं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 7:33 PM IST

Harshvardhan Patil
हर्षवर्धन पाटील यांना धमकी

Harshvardhan Patil : देशभरात लवकरच निवडणूक होणार असून प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आलीय. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिलंय.

पुणे Harshvardhan Patil : गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या घटक पक्षात संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच इंदापूरमध्ये भाजपाच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळं सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय. ही बाब गंभीर असून यात तत्काळ लक्ष द्यावं अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस यांना केलीय.



तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी : भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीनं कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत आहे. असं असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी जाहीर मेळावे आणि सभामधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळं मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे.

हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यात फिरू न देण्याची जी धमकी आलीय, त्याबाबत कोणाचा गैरसमज झाला असेल तर आम्ही नक्की चर्चा करू. तसेच हर्षवर्धन पाटील यांना कोणीही धमकी दिलेली नाही. जर कोणी धमकी दिली असेल तर ते त्यांना विचारावं लागेल. मी आज उद्या हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार आहे आणि मला खात्री आहे की, आमच्या तालुक्यात असं काही घडणार नाही.- प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट


पत्रात केली विनंती : सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तत्काळ लक्ष घालावं. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणं आवश्यक आहे. तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेवून योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावं, हि विनंती असं पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. जागा वाटपावरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर; तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील - शंभूराज देसाई
  2. बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंची प्रचारात आघाडी; आपल्या कार्याची अहवाल पुस्तिका केली प्रसिद्ध
  3. नागपूर विमानतळावर पंतप्रधान मोदींनी केली कार्यकर्त्यांची विचारपूस; कार्यकर्ते म्हणाले,...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.