ETV Bharat / politics

Anuradha Paudwal Join Bjp : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 3:14 PM IST

Anuradha Paudwal Join Bjp : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. दिल्लीतील भाजपा कार्यालयात जाऊन त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलंय.

Anuradha Paudwal Join Bjp: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश
Anuradha Paudwal Join Bjp: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश

नवी दिल्ली Anuradha Paudwal Join Bjp : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश केलाय. आज दुपारी त्यांनी दिल्लीतील भाजपा कार्यालय गाठून पक्षात प्रवेश केला. देशात लवकरच लोकसभा निवडणुका होत असताना अनुराधा पौडवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. निवडणूक आयोग आज लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे.

काय म्हणाल्या अनुराधा पौडवाल : भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, आज मी अशा लोकांमध्ये सामील होत आहे, ज्यांचं सनातनशी घट्ट नातं आहे. चित्रपटसृष्टीत गायल्यानंतर मी भक्तीगीतंही गायली आहेत. रामल्लाची स्थापना झाली तेव्हा मला तिथं गाण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्यच आहे." तसंच आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यावर गायिका अनुराधा पौडवाल म्हणाल्या आता तर मला माहीत नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल.

कोण आहेत अनुराधा पौडवाल : अनुराधा पौडवाल एक लोकप्रिय गायिका आहेत. त्यांचा जन्म 'अलका नाडकर्णी' म्हणून 27 ऑक्टोबर 1952 रोजी कर्नाटकातील एका कुटुंबात झाला. त्यांनी 1973 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. अभिमान चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा एक संस्कृत श्लोक गायला. 1973 मध्ये त्यांनी यशोदा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

5 दशकांची कारकीर्द : अनुराधा पौडवाल यांनी चित्रपटसृष्टीत 5 दशकांहून अधिक काळ घालवलाय. या काळात त्यांनी हिंदी व्यतिरिक्त कन्नड, मराठी, संस्कृत, बंगाली, तमिळ, तेलगू, ओरिया, आसामी, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी आणि मैथिली अशा अनेक भाषांमध्ये 9000 हून अधिक गाणी गायली आहेत. याशिवाय अनुराधा पौडवाल यांच्या भजनांनाही देशभरातील लोकांचं भरभरुन प्रेम मिळालंय. त्यांनी 1500 हून अधिक भजनं गायली आहेत.

हेही वाचा :

  1. Nitin Gadkari News: ...म्हणून २००४ मध्ये अपघातात संपुर्ण कुटुंब वाचले- नितीन गडकरी
  2. Anuradha Paudwal In Sultanpur : भाजप सरकार संगीताच्या दिशेने चांगले काम करत आहे, गायिका अनुराधा पौडवाल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.