ETV Bharat / politics

रोकड मोजणाऱ्यांनी मोदींना भेकड म्हणू नये, तुमची उठ-बस सेना का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Eknath Shinde news

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 11:11 AM IST

Eknath Shinde on Raj Thackeray support
Eknath Shinde on Raj Thackeray support

Eknath Shinde News महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेते. ते नागपूर विमानतळावर मंगळवारी रात्री बोलत होते.

नागपूर Eknath Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " मी त्यांचे स्वागत करतो. राज ठाकरेंनी मोदी साहेबांचे नेतृत्व आणि विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला. त्याकरिता मी त्यांचे अभिनंदन करतो."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " महायुतीला पाठिंबा देत असताना राज ठाकरेंनी कुठलीही अट ठेवलेली नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिला. राज ठाकरे यांचा राजकीय पक्ष आहे. प्रत्येकचं पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आधी लोकसभा तर होऊ द्या. पहिले लोकसभा आटपू द्या, मग विधानसभेचं पाहू."



चायनीज सेना तर तुमची उठ-बस सेना- उद्धव ठाकरे यांनी महायुतीला चायनीज सेना, असं म्हटलं होतं. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, " जर ते आम्हाला चायनीज सेना म्हणत असतील तर त्यांची सेना कुठली आहे? उठा-बसा सेना का? आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे. बाळासाहेबांच्या विचारांची ही शिवसेना आहे. काँग्रेस प्रणित शिवसेना नाही. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांनी आणि सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये. तुम्ही मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले. शिवसेनेचा धनुष्यबाण गहाण ठेवला. तेव्हा आम्हाला आमची शिवसेना वाचवण्यासाठी व शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली," असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.



रोकड मोजणाऱ्यांनी मोदींना भेकड म्हणू नये- महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकारच नाही. नरेंद्र मोदींना भेकड म्हणणं योग्य नाही. कोरोनाच्या काळात ते घरी बसले होते. मोदींनी देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना पुढे येऊन मदत करत होते. तेव्हा आरोप लावणारे घरी बसून कोणतं शौर्य दाखवत होते? जेव्हा कोरोनामध्ये लोक मरत होते, तेव्हा हे घरी बसून रोकड मोजत होते. मग त्यांना रोकड पक्षाचे अध्यक्ष म्हणावं का? रोकड मोजणाऱ्यांनी मोदींना भेकड म्हणू नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मोदींचे हात बळकट करू:- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या आहेत. त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येतील, अशी गॅरंटी मतदारांनी मोदींना दिली आहे. 45 जागा जिंकून मोदींचे हात बळकट करू. महायुतीचे जागावाटपही लवकरात लवकर जाहीर होईल, अशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.

हेही वाचा-

  1. "राजा का बेटा अब राजा नहीं बनेगा..."; मोदी घराणेशाही नाही का?, विरोधकांचा एकनाथ शिंदेंना सवाल - Lok Sabha Election 2024
  2. "मला जर शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर...."; राज ठाकरेंनी थेटच सांगितलं - Raj Thackeray speech
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.