ETV Bharat / politics

माझा विजय निश्चित, सर्व जाती धर्माने साथ द्यावी; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 7:20 PM IST

Pankaja Munde
पंकजा मुंडे

Lok Sabha Election 2024 : बीड लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) आणि पंकजा मुंडे यांच्यात सामना होणार आहे. पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिलीय.

प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे

बीड Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसरा टप्प्यातील प्रचारासाठी २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी परळी येथे त्यांच्या घरी त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे, भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक महिलांनी त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर त्यांनी परळी येथील प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घेऊन गोपीनाथ गडाकडं त्या प्रस्थान केलं. गोपीनाथ गडावर त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं दर्शन घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आज सकाळपासून मी थोडी गंभीर आहे. मला शब्दामध्ये माझी भावना सांगता येणार नाही. कारण गोपीनाथ मुंडे हा अर्ज नेहमी भरत होते. मी त्यांच्याबरोबर असायचे. प्रचाराची जबाबदारी माझ्याकडे असायची. प्रीतम मुंडे यांच्यावेळीही प्रचारात मी मुख्य असायचे.आता स्वत:साठी अर्ज भरायचा हा एक वेगळा अनुभव आहे. आज मला अनेकांनी विचारले तुम्ही नेहमी सारख्या फ्रेश दिसत नाही. मला हे शब्दात वर्णन करता येणार नाही. मी नाही म्हणत असताना लोक या ठिकाणी आले आहेत. माझा विजय निश्चित आहे. - पंकजा मुंडे, भाजपा नेत्या



जिल्ह्यातील सर्व जाती धर्मानी मला साथ द्यावी : पंकजा मुंडे यांच्या समवेत त्यांचे भाऊ धनंजय मुंडे, मुलगा आर्यमन पालवे त्यांचे मामा प्रकाश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील तसंच बाहेरच्या जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितलं की, मुंडे साहेबांची उणीव दूर करण्याचा मी प्रयत्न करणार असून जिल्ह्यातील सर्व जाती धर्मानी मला साथ द्यावी.

हेही वाचा -

  1. काँग्रेसमधील घरभेदीवरून अशोक चव्हाण-नाना पटोले यांच्यात वाक्युद्ध, भाजपा प्रवक्त्यानं 'ही' दिली प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024
  2. अमरावतीत आज राजकीय दंगल; अमित शाह यांची सभा, बच्चू कडू यांची मिरवणूक - Ravi Rana Vs Bacchu Kadu
  3. अनामत रक्कमेमुळं निवडणुक आयोग होतो मालामाल; मागील लोकसभेत किती उमेदवारांचं जप्त झालं होतं 'डिपॉझिट'? - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.