ETV Bharat / politics

...तर बारामतीतून सुनेत्रा पवारच उमेदवार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 1:11 PM IST

Baramati Loksabha Constituency : महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे. बारामतीची जागा आम्हाला मिळाल्यास सुनेत्रा पवार याच आमच्या महायुतीच्या उमेदवार असतील, असं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय.

...तर बारामतीतून सुनेत्रा पवारच उमेदवार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
...तर बारामतीतून सुनेत्रा पवारच उमेदवार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

सुनील तटकरे

रत्नागिरी Baramati Loksabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार हे जवळपास स्पष्ट झालंय. कारण महाविकास आघाडीकडून या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झालीय. तर महायुतीच्या जागांचं वाटप झाल्यानंतर, ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यावर सुनेत्रा पवार याच आमच्या महायुतीच्या उमेदवार असतील, असं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. ते गुहागरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

जागावाटप जवळपास पुर्ण : दरम्यान एकूणच राजकीय घडामोडींबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, "परवा दिल्लीत जी बैठक झाली. ती अत्यंत समन्वय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. या निर्धारातून आमची चर्चा झाली. 80 ते 85 टक्के जागा वाटप पूर्ण झालेलं आहे." तसंच दोन दिवसांत पुन्हा एक बैठक होईल. दरम्यान मित्रपक्ष खोटं पसरवत आहेत, आमच्यात कुठंही वेगळी भूमिका नाही. मित्रपक्षांना विश्वासात घेतच चर्चा सुरु आहेत. लोकसभेच्या जागांबाबत भुजबळांनी पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. राष्ट्रवादीबाबत जे काही पसरवलं जातं त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही, असं म्हणत तटकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

सुनेत्रा पवारच उमेदवार : सुनील तटकरे म्हणाले, " महाविकास आघाडीकडून सुप्रियाताईंची उमेदवारी जाहीर होणं ही औपचारिकता होती. या जागेवर निवडणूक लढवावी असं आमच्या राष्ट्रवादीच्या सर्वांचं म्हणणं आहे. त्यामुळं महायुतीच्या जागांचं वाटप झाल्यानंतर, ही जागा राष्ट्रवादीला मिळल्यावर सुनेत्राताई पवारच आमच्या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत." "राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. त्यावेळी कोणी असं म्हटलं असतं की, ठाकरे परिवार एक आहे, तर कदाचित त्यांना वेगळं वाटलं असतं, असं प्रत्युत्तर तटकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला दिलं. तसंच आता आम्ही निर्णय घेतला. त्या निर्णयाचीच वाटचाल आम्ही करत आहोत," असं देखील तटकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. बारामती लोकसभेसाठी स्वत: शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा
  2. 'त्या' FIR मध्ये रोहित पवारांचं नाव नाही, एजन्सीची भीती दाखवली जात आहे; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.