ETV Bharat / politics

नाना पटोले यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करा - अतुल लोंढे - Nana Patole Car Accident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 11:00 PM IST

Nana Patole Car Accident
नाना पटोले

Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीला बुधवारी रात्री चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अपघातात नाना पटोले यांच्या गाडीचं मोठं नुकसानं झालं आहे. तर सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केलीय.

प्रतिक्रिया देताना नाना पटोले

मुंबई Nana Patole Car Accident : महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या सभा विदर्भात पार पडत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) भंडारा जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असताना रात्रीच्या सुमारास एका ट्रकणं त्यांच्या गाडीला धक्का देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना अतिशय गंभीर असून नाना पटोले यांचा घातपात करण्याचा डाव होता का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी उपस्थित केला आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलीय.

घटनेची सखोल चौकशी करावी : काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि निवडणुक आयोगाला याबाबत पत्र पाठविलं आहे. त्यात लोंढे यांना म्हटलं की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे 9 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूकीचा भंडारा जिल्ह्यातील प्रचार संपवून साकोली गावाकडं गाडीनं जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला एका ट्रकनं धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला. पटोले हे काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते असल्यामुळं या प्रकरणाकडं त्वरित लक्ष देऊन सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढविण्यात यावी : लोकसभा निवडणूकिसाठी नाना पटोले यांना राज्यभर दौरे करीत आहे. भंडारा जिल्ह्यात घडलेल्या घटनकडे पाहता भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून नाना पटोले यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढविण्यात यावी अशी मागणी अतुल लोंढे यांनी पत्रात केली आहे.


मी सुखरूप आहे : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमाना याविषयी माहिती दिली आहे. बुधवारी रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथील प्रचारसभा संपवून राहत्या गावी सुकळी येथे जात असतांना, भिलेवाडा जवळ माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात होता की, घातपाताचा प्रयत्न होता असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच या घटनेची पोलीस चौकशी करतील. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम आणि परमेश्वराच्या कृपेनं मी सुखरूप असल्याचं म्हणत काळजी नसावी असं नाना पटोले यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. सर्वसामान्यांच्या विकासाचा माविआचा विचार घराघरात पोहोचवा - बाळासाहेब थोरात - Lok Sabha Election 2024
  2. पश्चिम महाराष्ट्रातील 'या' मोठ्या नेत्याचा होणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश, उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम - Lok Sabha Election
  3. भाऊ आणि बहिणीच्या नात्याला समर्पित 'भावंड दिन'; 'हे' आहेत राजकीय क्षेत्रातील चर्चेतील भावंड - Sibling Day 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.