ETV Bharat / politics

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोकराव चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, एक ते दोन दिवसात ठरविणार राजकीय दिशा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 3:24 PM IST

Updated : Feb 12, 2024, 5:55 PM IST

Ashok Chavan First Reaction : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपामध्ये जाण्यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नसल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

Ashok  Chavan first reaction
Ashok Chavan first reaction

अशोकराव चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी साधला संवाद

मुंबई Ashok Chavan First Reaction : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. याबाबत काँग्रेस नेते चव्हाण यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण म्हणाले, मी काँग्रेसचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोलेंकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणं पक्षाचं काम केलं आहे. पक्षाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एक ते दोन दिवसात राजकीय दिशा ठरविणार आहे. भाजपामध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसात अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. प्रत्येक गोष्टीला कारण असलेच पाहिजे असे नाही. माझ्यासाठी पक्षानं खूप काही केलं. मीदेखील पक्षासाठी खूप काही केलं आहे.

मी आमदार म्हणून विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडं मी माझा राजीनामा दिला आहे. तसंच मी काँग्रेस कार्यकारिणीचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मी निर्णय घेतलेला नाही. कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही- माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

काँग्रेसबाबत नाराजी नाही- माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. मी काँग्रेसबाबत नाराज नाही. अन्य पर्याय पाहिले पाहिजे म्हणून मी राजीनामा दिला. मला कुणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. भाजपाची कार्यप्रणाली मला माहित नाही. जन्मापासून काँग्रेसमध्ये काम केलं आहे. काँग्रेसच्या कोणत्याच आमदारासोबत चर्चा केली नाही. पंतप्रधान मोदींशी माझा संवाद झाला नाही. भाजपाकडून मला कोणतेही आश्वासन मिळालं नाही. तसेच राज्यसभेची मागणी केली नाही. महाविकास आघाडी जागावाटपा संदर्भात उशीर होत आहे.

काँग्रेसला बसला मोठा धक्का- दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यापाठोपाठ अशोकराव चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोकराव चव्हाण यांनी 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. मात्र, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 2014 च्या निवडणुकीत अशोकराव चव्हाण नांदेड मतदारसंघातून निवडून आले. भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी चव्हाण यांचा 2019 मध्ये पराभव केला. अशोकराव हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.

हेही वाचा-

  1. काॅंग्रेससोबतचा सहा दशकांचा वारसा तरीही अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर; वाचा राजकीय कारकीर्द
  2. काँग्रेसमधलं 'अशोकपर्व' संपलं! माजी मुख्यमंत्र्यांनी दिला पक्षसदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा
Last Updated :Feb 12, 2024, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.