ETV Bharat / politics

लोकसभा निवडणूक 2024 : माघार घेतलेले आनंदराज आंबेडकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 10:56 PM IST

Lok Sabha Election 2024: रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Anandraj Ambedkar announced to contest Amravati Lok Sabha Election
आनंदराज आंबेडकर

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर

अमरावती Lok Sabha Election 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. रिपब्लिन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दोन दिवसांपूर्वीच अमरावतीतून निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र, आता ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसंच वंचित आणि एमआयएमनं दिलेला पाठिंबाही त्यांनी स्वीकारला आहे. त्यामुळं आता अमरावतीच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे.

आंबेडकरी जनतेच्या हिताची उमेदवारी : आज (7 एप्रिल) पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, "मी उमेदवारी मागे घेणार असं जाहीर केल्यावर अमरावतीतील जनतेचे मला सतत कॉल येत होते. तुम्ही उमेदवार नसाल तर आम्ही आत्मदहन करु, असा इशाराही काहींनी दिला होता. एकूणच जनतेच्या भावना लक्षात घेत मी निवडणूक लढण्याचा नव्यानं विचार केला." तसंच माझी उमेदवारी ही आंबेडकरी जनतेच्या हिताची उमेदवारी असल्याचंही आनंदराज आंबेडकर यावेळी म्हणाले.

न्यायव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह : पुढं ते म्हणाले की, "आज सर्वोच्च न्यायालयातील काही जज हे राजकारण्यांचेच जज आहेत, असं वाटायला लागलंय. खरंतर देशातील नेत्यांवर अंकुश राहावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला विशेष अधिकार दिले आहेत. मात्र, दुर्दैवानं आज न्यायालयाचे न्यायाधीश हे राजकारण्यांच्या म्हणण्याप्रमाणं वागत आहेत", अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

...त्यामुळं घेतली होती माघार : 2 एप्रिलला आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, वंचित बहुजन आघाडीनं त्‍यांना पाठिंबा जाहीर करण्‍यास उशीर केल्‍यानं त्‍यांनी निवडणुकीतून माघार घेण्‍याची घोषणा केली होती. त्यानंतर 4 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार रिंगणात न उतरविण्‍याचा निर्णय घेऊन आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, त्यानंतरही आनंदराज आंबेडकर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. तसंच आपल्‍या नामांकन रॅलीत वंचित बहुजन आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांनी सहभागी होऊ नये, यासाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी तंबी दिल्‍याचा आरोप देखील आंबेडकर यांनी केला होता.

हेही वाचा -

  1. डॉ बाबासाहेबांचे नातू लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना आलेल्या समर्थकाची जोरदार चर्चा, सेल्फी काढण्याकरिता लोकांनी का केली गर्दी? - Tattoo of Dr Babasaheb Ambedkar
  2. अमरावतीत आंबेडकर बंधुची खेळी; 'वंचित'चा आनंदराज यांना बिनशर्त पाठिंबा - LOK SABHA ELECTIONS
  3. Anandraj Ambedkar : इंदू मिलमधील स्मारकातील सुधारणाकडे सरकारचे दुर्लक्ष, आनंदराज आंबेडकर यांचा आंदोलनाचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.