ETV Bharat / politics

तुतारी की घड्याळ? दोन्हीकडं फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा सज्जड दम म्हणाले, कुुंकू लावायचे असेल तर... - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 9:10 PM IST

Updated : Apr 28, 2024, 10:13 PM IST

Ajit Pawar News
उपमुख्यमंत्री अजित पवार

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून काही कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी आपले पवार कोणते याची निवड केली नाही. हेच कार्यकर्ते कधी अजित पवारांच्या (Ajit Pawar) सभेत दिसतात तर कधी शरद पवारांना (Sharad Pawar) पाठिंबा देताना दिसतात. याच दोन्ही दगडावर पाय ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी सज्जड दम दिलाय.

पुणे (बारामती) Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणुकीकडं (Baramati Lok Sabha) महाराष्ट्रच लक्ष लागलंय. येथे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. बारामतीच्या या लढाईत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात संघर्ष आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय.

"कुंकू लावायचा असेल तर एकाचेचं लावा" : सभेत अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्याकडं पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडं जातात. बिनविरोध मी पदे दिली. मात्र, तुम्ही त्यांचा प्रचार करत आहात. कुंकू लावायचा असेल तर एकाचेचं लावा". माझे तरी लावा नाही तर त्यांचं तरी लावा, हा काय चाटाळपणा लावलाय? असा पश्र अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विचारला आहे.

रोहित पवारांना टोला : यावेळी अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा संदर्भ घेत म्हणाले की, उद्या कदाचित ते बोलतील अजित दादा दम द्यायला लागलेत. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय. अशा स्वरूपात अप्रत्यक्षरीत्या रोहित पवार यांना त्यांनी टोला मारला. पण हे बोलताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेते देशमुख यांच्या उपोषणाचा संदर्भ दिला. उपमुख्यमंत्री म्हणाले, " जे वाक्य वापरलं होतं आणि त्यातून त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मी माझ्या मेंदूला सातत्यानं सांगत असतो की, आपल्याला शब्द जपून वापरायचा आहे."

हेही वाचा -

  1. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी का केली जात आहे? अमोल कोल्हेंचा सवाल - Shirur Lok Sabha election
  2. आधी बारामतीचा विकास केला, मग मतं मागायला आलो, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला - Ajit Pawar taunted Supriya Sule
  3. शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी उमेदवार - डॉ. अमोल कोल्हे - Amol Kolhe
Last Updated :Apr 28, 2024, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.