ETV Bharat / opinion

टी-20 विश्वचषक अमेरिकेत क्रिकेट पुनरुज्जीवित करणार का? एकेकाळी क्रिकेट होता अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ - T20 World Cup 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 7:20 PM IST

T20 World Cup 2024
अमेरिका क्रिकेट साजरा करणार का? अमोरिकेत सुरु होतोय टी-20 विश्वचषकाचा अध्याय

T20 World Cup 2024 अमेरिकेत 18व्या शतकात गृहयुद्धापूर्वी आवडता खेळ असलेला क्रिकेट आज देशात फक्त औषधाला उरलाय. असं का घडलं, याचं विश्लेषण क्रीडा पत्रकार मीनाक्षी राव यांनी केलंय करतात. त्याचवेळी अमेरिकेत होणारा टी-20 क्रिकेट विश्वचषक क्रिकेटला पुन्हा अमेरिकेत उर्जितावस्था आणण्यास मदत करेल अशी त्यांना आशा आहे. वाचा सविस्तर...

हैदराबाद T20 World Cup 2024 : तुम्हाला माहीत आहे का? क्रिकेट हा एकेकाळी अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ होता. मात्र आता फक्त नावालाच उरलेल्या क्रिकेटला अमेरिकेत पुन्हा भाव येऊ शकतो. आता पुन्हा एकदा अमेरिका आयसीसीची मोठी स्पर्धा होणार आहे. खरं तर अमेरिकेत 1751 मधील पहिल्या विक्रमी क्रिकेट सामन्यापासून घडलेला प्रवास हा रंजक आहे. सुरुवातीला कसोटी क्रिकेटचा 5 दिवसांचा खेळ खूप वेळ घेणारा, खूप गुंतागुंतीचा आणि उदयोन्मुख उदारमतवादी अर्थव्यवस्थेसाठी खूप कंटाळवाणा होता.

दुसरीकडे बेसबॉल, जो वसाहतवादी मार्गानं अमेरिकेत आला. हा खेळही काहीसा क्रिकेटसारखाच होता. मात्र आटोपशीर असा तीन तासांचा खेळण्याचा वेळ, साधे नियम आणि साध्या साधनांच्यामुळे हा खेळ अमेरिकनांना अधिक भावला. क्रिकेट आणि बेसबॉल हे दोन्ही खेळ हिट-द-बॉल आणि रन प्रकारचे खेळ होते. परंतु तिथं बेसबॉलनं क्रिकेटवर मात केली. कारण त्याचा फॉरमॅट आणि आटोपशीर वेळ लोकांना आवडली. त्या काळातील क्रिकेटची अवस्था मात्र पूर्णपणे विरुद्ध होती. खेळणाऱ्याला आणि त्याचा आनंद घेणाऱ्यालाही पाच-पाच दिवस निकालाची वाट पाहावी लागायची. तसंच निकालही लागेलच असंही नव्हतं.

अमेरिकन गृहयुद्ध आणि दोन महायुद्धांच्या अनिश्चिततेनं क्रिकेटला अमेरिकेनं रामरामच केला. त्यातून क्रिकेटसारखाच मात्र झटपट वेगवान बेसबॉलनं चांगलाच जम बसवला. थोडक्यात, क्रिकेटच्या पूर्णपणे वसाहतवादी खेळाकडून देशांतर्गत बेसबॉलकडे अमेरिकन वळले. याचाही उगम उगम शाही ब्रिटनमध्येच झाला होता. परंतु सर्व अमेरिकन सुधारणांसह बेसबॉल विकसित झाला होता. आज आपण जो बेसबॉलचा खेळ पाहतो तो संपूर्णपणे अमेरिकन देशी आवृत्ती आहे. अमेरिकन लोकां असंच वाटतं की, बेसबॉल हा कधीच वसाहतवादी वारसा नव्हता, तर तो टाउन बॉल नावाच्या खेळातून विकसित झाला होता. हा खेळ 19व्या शतकाच्या सुरुवातीला युनायटेड स्टेट्समध्ये खेळला जात असे.

बेसबॉलचा पहिला रेकॉर्ड केलेला सामना 1846 मध्ये होबोकेन, न्यू जर्सी इथं झाला. हा सामना निकरबॉकर बेसबॉल क्लब आणि न्यूयॉर्क नाइन्स यांच्यात खेळला गेला. अलेक्झांडर कार्टराईट यांनी लिहिलेलं निकरबॉकर नियम हे बेसबॉल खेळाच्या सुरुवातीच्यापैकी एक आहेत. यानंतर अमेरिकेत क्रिकेट मागे पडत गेला. तर 1876 मध्ये नॅशनल लीगसारख्या व्यावसायिक लीगच्या निर्मितीसह बेसबॉलची अमेरिकेत लोकप्रियता वाढली. नियम, खेळासाठी लागणारा साधनं आणि गेमप्लेमधील बदलांसह बेसबॉलचा खेळ सतत विकसित होत राहिला. ज्यामुळं अखेरीस बेसबॉल अमेरिकेचा मनोरंजन केंद्र म्हणून उदयास आला. जरी बेसबॉलची मूळं इंग्लिश बॅट आणि बॉल तेच असले तरी अमेरिकेत त्याचं स्वरुप बदलत गेलं आणि आजचा बेसबोलचा खेळ विकसित झाला, तो प्रत्येक अमेरिकन माणसाला आपलासा वाटतो.

गेल्या काही वर्षांत, किंवा शतकानुशतकं म्हटलं तरी चालेल, अमेरिकन सॉकर आणि टेनिस सारख्या इतर खेळांनी अमेरिकन लोकांमध्ये लोकप्रियता मिळवली. बेसबॉल त्यामध्ये अव्वल स्थानी आहे. अलिकडच्या काळात क्रिकेटला शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून राष्ट्रीय खेळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरु असताना, बेसबॉल आणि सुपर बाउल (अमेरिकेतील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धा) या दोन्ही खेळांनी लक्षणीय सांस्कृतिक प्रभावासह मोठी प्रगती केली आहे.

बेसबॉलनं प्रत्येक हंगामात 162 स्पर्धांसह आपली ताकद दाखवून दिलीय. दुसरीकडे, सुपर बाउल, त्याच्या 16-सामन्यांचा वार्षिक सीझन, भारतातील IPL प्रमाणेच देशभरात आयोजित केलेल्या स्पर्धांसह लोकप्रिय झाला आहे. त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण होत असताना लोकांचे डोळे त्याकडेच लागलेले असतात. सुपर बाउल, नॅशनल फुटबॉल लीगचा चॅम्पियनशिप गेम यांची लोकप्रियता अमेरिकेत आहे. आज या दोन्ही खेळांचे चाहते अमेरिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत. टेनिसनंही तिथे चांगलेच पाय रोवले आहेत. महान खेळाडूंच्या यशामुळं चालणारा खेळ बनलेला आहे. तर अमेरिकेत क्रिकेटची उपस्थिती माफक आहे. टेनिसचा एक मोठा इतिहास आहे, 1870 पासून तो न्यूयॉर्क आणि बोस्टन इथं स्थापन झालेल्या टेनिस क्लबद्वारे खेळ सुरू झाला. खेळाची लोकप्रियता झपाट्यानं पसरली आणि 19व्या शतकाच्या अखेरीस टेनिस हा उच्च वर्गातील लोकांचा आवडता खेळ बनला. 1968 मध्ये सुरू झालेल्या टेनिसमधील खुल्या युगानं पुरुषांच्या बाजूनं जिमी कॉनर्स, जॉन मॅकेनरो, पीट सॅम्प्रास आणि आंद्रे अगासी आणि महिलांच्या बाजूनं ख्रिस एव्हर्ट, सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स यांसारखे अनेक जगप्रसिद्ध अमेरिकन खेळाडू निर्माण केले.

या खेळाडूंनी अमेरिकेत आणि जगभरात टेनिसची लोकप्रियता वाढवली. याचा अर्थ असा की अमेरिकन स्पोर्ट्स हब हे डाय-हार्ड चाहत्यांनी गजबजलेलं ठिकाण आहे आणि क्रिकेटसारख्या भूतकाळातील दिग्गज खेळाच्या पुन:प्रवेशासाठी अतिशय योग्य जागा आहे. त्यामुळं आज, जेव्हा आयसीसीनं टी-20 विश्वचषकाद्वारे क्रिकेटला त्याच्या वेगवान आणि लहान स्वरुपासह लोकप्रिय कल्पनेत परत आणण्याचा निर्धार केला आहे तेव्हा त्याचा नक्कीच उपयोग होईल.

अमेरिकेत 20 दशलक्ष क्रिकेट प्रेमी आहेत, ज्यात 50 लाख भारतीय, तितकेच पाकिस्तानी, 3 लाख बांगलादेशी आणि सुमारे 1 लाख श्रीलंकन ​​आहेत. जे क्रिकेट खेळतात, त्याच्यावर प्रेम करतात आणि टीव्हीवर क्रिकेट बघत असतात. यामुळंच 2 जून 2024 पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या अमेरिकन फेरीची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. अर्थात, 2 जून ते 19 जून या कालावधीत अमेरिकेत चालणाऱ्या या स्पर्धेत कॅरिबियनमध्ये ही स्पर्धा बाद फेरीत जाण्यापूर्वी केवळ गट टप्प्यातील सामने सुरू होतील. बिग सॅमच्या बेसबॉल-सॉकर-टेनिस-गोल्फ नंदनवनात क्रिकेट मोहिमेची सुरुवात करणारे भारत आणि पाकिस्तान हे मुख्य संघ आहेत. आता पाहायचे आहे की, यातून अमेरिकेत क्रिकेट पुन्हा उर्जितावस्थेला येईल काय...

हेही वाचा..

  1. 'साई'कृपेनं गुजरात विजयी! घरच्या मैदानावर पंजाबच्या 'किंग्ज'चा पराभव, मागील पराभवाची गुजरातकडून व्याजासह परतफेड - PBKS vs GT
  2. KKR नं RCB ला केलं 1 धावानं चितपट, RCB सलग सहावा पराभव - KKR vs RCB Live score IPL 2024
  3. शुभमन गिल होणार भारतीय संघाचा कर्णधार; सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य - next India captain
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.