ETV Bharat / opinion

हिम सरोवरांच्या वितळण्यात मोठी वाढ; भारताला आहे मोठा धोका - Expansion in Glacial Lakes

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 11:23 AM IST

Expansion in Glacial Lakes
संग्रहित छायाचित्र

Expansion in Glacial Lakes : वाढत्या तापमानाचा परिणाम हिम सरोवरांच्या वितळण्यात होत आहे. भारतातील हिम सरोवरांच्या वितळण्याचा वेग प्रचंड आहे. यात सिंधू नदीच्या खोऱ्यात 65, गंगा नदीच्या खोऱ्यात 7 आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात 58 हिम सरोवरांचा समावेश आहे.

नवी दिल्ली Expansion in Glacial Lakes : तापमान वाढल्यानं त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्यातच आता उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात शनिवारी एक हिमकडा खाली घसरला. त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) वाढत्या हिमनदी आणि हिम सरोवरांच्या बाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) अनेक दशकांच्या उपग्रह फोटोच्या विश्लेषणातून भारतीय हिमालयातील हिमनद्या वितळत असल्याचं स्पष्ट केलं. "हिमनद्या मोठ्या वेगानं वितळत आहेत, त्यामुळे संकट टाळण्याकडं लक्ष देण्याची गरज आहे," असं इस्रोनं स्पष्ट केलं आहे.

हिम सरोवर वितळण्यात झाली मोठी वाढ : तापमान वाढत असल्यानं हिमनद्या आणि हिम सरोवर मोठ्या प्रमाणात वितळत आहेत. याबाबत उपग्रहानं पाठवलेल्या फोटोतून ही बाब उघड झाली. त्यामुळे इस्रोनं धोक्याची घंटा दिली आहे. हिमालयातील हिमनदी आणि हिम सरोवरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. उपग्रह फोटोतून याबाबतची माहिती उघड झाली आहे, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं (ISRO) सोमवारी स्पष्ट केलं. मागील 3 ते 4 दशकांत उपग्रह डेटा संग्रहातून हिमनदीच्या वातावरणात होणाऱ्या बदलांबद्दल मोठी धक्कादायक माहिती मिळाली, असा दावा इस्रोनं केला आहे. 1984 ते 2023 पर्यंत भारतीय हिमालयीन नदी खोऱ्यांच्या पाणलोटांना कव्हर करणाऱ्या उपग्रह फोटोतून हिमनदी तलावांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवत आहे. 2016-17 मध्ये 10 हेक्टरपेक्षा मोठ्या 2 हजार 431 तलावांपैकी 676 हिमनदी आणि हिम सरोवरांचा विस्तार झाल्याचं उघड झाली आहे.

भारतासाठी आहे मोठा धोका : भारतातील हिमनद्या आणि हिम सरोवरांचा विस्तार होत असल्याचं स्पष्ट झाल्यानं इस्रोनं इशारा दिला आहे. 676 हिम सरोवरांचा विस्तार झाल्याचं उघडं झालं, त्यातील 130 सरोवरं भारतात वसली आहेत. यातील सिंधू नदीच्या खोऱ्यात 65, गंगा नदीच्या खोऱ्यात 7 आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात 58 हिम सरोवरांचा समावेश आहे, असंही इस्रोनं स्पष्ट केलं. हिम सरोवरांचा विस्तार होणं, हे जागतिक हवामानातील बदलांसाठी अत्यंत संवेदनशील मानलं जाते. अठराव्या शतकात औद्योगिक क्रांती सुरू झाल्यापासून जगभरातील हिमनद्या वितळत असल्याचं संशोधनात सातत्यानं दिसून आलं.

हिम सरोवर वाढीचा दर आहे मोठा : दुर्गम भूभागामुळे हिमालयीन प्रदेशातील हिम सरोवरांच्या विस्ताराचा अभ्यास करणं आव्हानात्मक मानलं जाते. सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान हे त्याच्या विस्तृत कव्हरेजच्या क्षमतेमुळे इन्व्हेंटरी आणि मॉनिटरिंगसाठी एक उत्कृष्ट साधन असल्याचं सिद्ध झालं आहे. हिम सरोवरांमध्ये दीर्घकालीन बदलांचं मूल्यांकन करणं हिमनदी वितळण्याचे दर समजून घेणं, GLOF धोक्यांचं मूल्यांकन करणं आणि हवामान बदलाच्या परिणामांची अंतर्दृष्टी मिळवणं गरजेचं आहे, असं इस्रोनं स्पष्ट केलं. 314 हिम सरोवर 4 हजार ते 5 हजार मीटर श्रेणीमध्ये आहेत. तर 296 हिम सरोवर 5 हजार मीटरच्या वर आहेत. हिम सरोवरांचं वर्गीकरण त्यांच्या निर्मिती प्रक्रियेच्या आधारे मोरेन-डॅम, बर्फाचं पाणी, इरोशनमुळे झालेलं पाणी आणि इतर हिम सरोवरांमध्ये केलं जाते, असं एलिव्हेशन विश्लेषणात दिसून आलं. दरवर्षी हिम सरोवर वाढीचा दर 1.96 हेक्टर आहे.

हेही वाचा :

  1. पर्यावरणीय आघाडीवर बरंच काही करायचय....; उक्ती एक तर कृती मात्र वेगळीच - climate change rhetoric vs action
  2. जागतिक आरोग्य दिन 2024: 'माय हेल्थ, माय राईट' - WORLD HEALTH DAY 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.