ETV Bharat / international

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा शिरले वाकड्यात; म्हणाले, "भारतीय सैनिक..."

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 9:04 PM IST

मुइझ्झू
मुइझ्झू

India Maldives Dispute : मालदीव आणि भारताचे संबंध वारंवार बिघडत आहेत. भारतीय सैनिक मालदीवमध्ये राहणार नाहीत. तसंच, कोणत्याही गणवेशात ते येथे राहणार नाहीत, असा वादग्रस्त आदेशच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी काढलाय.

नवी दिल्ली : India maldive Dispute : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण असतानाच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी आणखी एक वक्तव्य केलंय. "10 मे नंतर एकही भारतीय सैनिक आपल्या देशात उपस्थित राहणार नाही, अगदी साध्या कपड्यांमध्येही नाही," असं विधान मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी केलंय. त्यामुळं आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुइझ्झू यांनी भारतीय जवानांच्या पहिल्या गटाला देशातून परतण्यासाठी 10 मार्च ही अंतिम मुदत दिलीय.

माहिती प्रसार माध्यामांनीही दिली : भारतविरोधी वक्तव्य केल्यानं भारत आणि मालदीव यांचे संबंध तानले गेले आहेत. त्यानंतरही मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. ते म्हणाले की, "येत्या 10 मेनंतर एकही भारतीय सैनिक, कर्मचारी आपल्या देशात उपस्थित राहणार नाहीत, अगदी साध्या कपड्यांमध्येही नाही." याबाबतची माहिती प्रसार माध्यामांनीही दिली आहे.

देशातून परतण्याची मुदत : भारताचं नागरी पथक मालदीवमध्ये नुकतंच पोहचलं आहे. त्यानंतर काही दिवसांतच मुइझ्झू यांचा हा निर्णय समोर आला आहे. मुइझ्झू यांनी भारतीय जवानांच्या पहिल्या गटाला देशातून परतण्यासाठी 10 मार्च ही अंतिम मुदत दिली होती. या विधानानंतर पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्ह आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाची बैठक : "10 मे नंतर एकही भारतीय सैनिक देशात उपस्थित राहणार नाही. ना गणवेशात ना साध्या कपड्यात. भारतीय सैनिक कोणत्याही प्रकारच्या पोशाखात या देशात राहणार नाहीत. मी हे आत्मविश्वासानं सांगतोय," असंही मुइझ्झू म्हणाले आहेत. यापूर्वी, गेल्या महिन्यात (दि. 2 फेब्रुवारी) दिल्लीत दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली होती.

हेही वाचा :

1 शहबाज शरीफ यांच्या खांद्यावर पाकिस्तानची धुरा; सलग दुसऱ्यांना पंतप्रधानपदी विराजमान

2 क्षेपणास्त्राचे भाग पाकिस्तानला नेणारं चीनी जहाज मुंबईत पकडलं : डीआरडीओनं सादर केला 'हा' अहवाल

3 "मिशन पूर्ण करुनच अंतिम श्वास सोडेन": इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ 'असं' का म्हणाले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.