ETV Bharat / entertainment

सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' चित्रपटामधील पडद्यामागील ॲक्शन व्हिडिओ व्हायरल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 6:55 PM IST

Sidharth Malhotra Yodha BTS video : सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर आगामी 'योद्धा' या चित्रपटातील पडद्याच्या मागील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो त्याच्या कूल अंदाजात दिसत आहे.

Sidharth Malhotra Yodha BTS video
सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धाचा बीटीएस व्हिडिओ

मुंबई - Sidharth Malhotra Yodha BTS video : चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आगामी 'योद्धा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेकजण वाट पाहात आहेत. आता सिद्धार्थ त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यग्र आहे. तो सतत 'योद्धा' चित्रपटाच्या संबंधित काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. दरम्यान, सिद्धार्थनं पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे दिग्दर्शित 'योद्धा' या आगामी चित्रपटाची बीटीएस (BTS) (पडद्यामागील) झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आता सिद्धार्थ 'योद्धा' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रानं शेअर केला व्हिडिओ : दरम्यान सिद्धार्थनं 'योद्धा'चा बीटीएस व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ''लाइट्स, कॅमेरा आणि...कामामागील एक झलक...अरुण कात्याल आणि इतर सर्वजणांबरोबर 'योद्धा'मध्ये असणं खूप छान वाटलं.'' याशिवाय चित्रपटाची रिलीज डेट त्यानं या पोस्टमध्ये लिहिली आहे. 'योद्धा' चित्रपट 15 मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रानं पडद्यामागचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो ॲक्शन स्टाईलमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक ॲक्शन सीन्स आहेत. त्याचे हाय-ऑक्टेन स्टंट हे खूप थरारक आहेत.

'योद्धा' चित्रपटाबद्दल : शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्वत:ला त्यानं या चित्रपटासाठी तयार केले हे सांगताना दिसत आहे. 'योद्धा'च्या पडद्यामागील व्हिडिओमध्ये सिद्धार्थनं सांगितलं की, ''मी या भूमिकेसाठी वजन कमी केलं आहे. मी खूप कठीण ट्रेनिंग घेतली.'' दरम्यान 'योद्धा'चा ट्रेलर 29 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. हा ट्रेलर फ्लाइटमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. मुंबई ते अहमदाबाद या विमान प्रवासादरम्यान हा ट्रेलर दाखवण्यात आला होता. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राबरोबर साऊथ अभिनेत्री राशि खन्ना आणि दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय या चित्रपटात कर्नल रवी शर्मा, अमित सिंग ठाकूर, शारिक खान, सॅमी जोनास हीनी आणि इतर कलाकार दिसणार आहेत. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित आगामी 'योद्धा' चित्रपट धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता निर्मित आहे.

हेही वाचा :

  1. मनोज जरांगे पाटील यांचा जीवनपट 'संघर्षयोद्धा'चे टिझर लाँच!
  2. करण जोहर ते हृतिक रोशनपर्यंतचे सेलिब्रिटी अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये होते गैरहजर
  3. नवविवाहित जोडपे रकुल आणि जॅकीनं 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील 'मस्त मलंग झूम' गाण्यावर केला भन्नाट डान्स
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.