ETV Bharat / entertainment

आर्यन खान दिग्दर्शित 'स्टारडम' वेब सीरीजच्या शूटिंग सेटवरचा व्हिडिओ व्हायरल - Aaryan Khan and Stardom web series

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 5:34 PM IST

Aaryan Khan and  Stardom web series
आर्यन खान आणि स्टारडम वेब सीरीज

Aaryan Khan and Stardom web series: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 'स्टारडम' या वेब सीरीजमधून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. आता या वेब सीरीजचं शूटिंग सुरू झालं आहे.

मुंबई - Aaryan Khan and Stardom web series: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा शूटिंग सेटवरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आर्यन 'स्टारडम' या वेब सीरीजमधून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. ही वेब सीरीज चित्रपटसृष्टीत येणाऱ्या आव्हानावर आधारित आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन, दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. आर्यन नुकताच मुंबईत शूटिंग करताना दिसला. त्याचा सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची एक झलक दिसत आहे. तो शुटिंग सेट पाहण्यासाठी आल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आर्यन खान दिग्दर्शन करत असलेल्या या वेब सीरीजबद्दल जाणून घ्यायला त्याचा चाहते उत्सुक आहेत.

आर्यन खान करणार चित्रपटसृष्टीत प्रवेश : सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून आर्यन खान दिग्दर्शन क्षेत्रात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता हा व्हिडिओ लिक झाल्यानंतर सेटवरचे आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन नये याबद्दल दक्षता घेतली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वेब सीरीजमध्ये मोना सिंग मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय या वेब सीरीजमध्ये शाहरुख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, करण जोहर आणि बॉबी देओल यांच्या कॅमिओ भूमिका देखील असतील. आर्यनला या वेब सीरीजपासून खूप अपेक्षा आहेत. आर्यन खानला अनेकजण त्याच्या आगामी वेब सीरीजसाठी शुभेच्छा देत आहेत.

आर्यन खानचं वैयक्तिक आयुष्य : नुकतेच आर्यन खाननं जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावली होती. आर्यनची 'स्टारडम' ही सहा भागांची डिजिटल वेब सीरीज आहे. या वेब सीरीजचे सध्या तिचे शूटिंग सुरू आहे. हे शाहरुख खानच्या होम प्रोडक्शन रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवले जात आहे. तसेच आर्यन खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर आर्यन खान याला 3 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर कथित अमली पदार्थ जप्त केल्यानंतर अटक करण्यात आली होती. मात्र याप्रकरणी आर्यनला न्यायालयानं निर्दोष असल्याचं घोषत केलं.

हेही वाचा :

  1. 'उत्तरन' मालिका फेम श्रीजिता डेच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो व्हायरल, पाहा सुंदर पोस्ट - Sreejita de
  2. मुंबईच्या रस्त्यावर दिसला सैफ अली खानचा 'नवाबी' थाट, घोडागाडीतून केली सैर - Saif Ali Khan
  3. विन डिझेलनं दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक डीजे कारुसोबरोबरचा थ्रोबॅक फोटो केला शेअर - Vin Diesel
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.