ETV Bharat / entertainment

रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल'वर टीका करणाऱ्यांना विद्या बालनचं सडेतोड उत्तर - VIDYA BALAN

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 2:08 PM IST

Vidya Balan On Movie Animal : विद्या बालन तिच्या आगामी चित्रपट 'दो और दो प्यार'चं प्रमोशन करत आहे. तिनं एका मुलाखतीदरम्यान 'ॲनिमल' चित्रपटाबद्दल विधान केलं आहे.

Vidya Balan On Movie Animal
विद्या बालन 'ॲनिमल' चित्रपटावर

मुंबई -Vidya Balan On Movie Animal : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी चित्रपट 'दो और दो प्यार'मुळे चर्चेत आहे . आता सध्या विद्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान विद्यानं अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'बद्दल मोकळेपणानं बोलली आहे. हा चित्रपट डिसेंबर 2023मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 900 कोटींचा व्यवसाय केला. 'ॲनिमल' या चित्रपटाला खूप टीकेला सामोरे जावं लागलं होतं, मात्र एका मुलाखतीदरम्यानं विद्यानं 'ॲनिमल'च्या निर्मात्यांचं खूप कौतुक केलं आहे.

विद्या बालन केलं 'ॲनिमल' चित्रपटावर विधान : तिनं म्हटलं, 'जर ठोस कंटेंट योग्य प्रकारे सादर केली गेली नाही तर ते अपयशी ठरते, मात्र मेहनत केल्यानंतर आपले काम दिसते. कंटेंट सर्व काही असते. हा विश्वासाचा खेळ आहे. 'ॲनिमल' या चित्रपटात आशय चांगला नव्हता असे नाही.' विद्याला 'ॲनिमल' चित्रपटातील काही वादग्रस्त कंटेंटबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं म्हटलं, 'चित्रपटात वेगवेगळी दृश्ये तयार करण्यात आली आहेत, चित्रपट त्याच्या मूलभूत गोष्टींपासून मजबूत आहे. या चित्रपटानं एका क्षणासाठीही प्रेक्षकांपासून दूर केलं नाही. हा एक मनोरंजक चित्रपट आहे.' विद्याला 'ॲनिमल' खूप आवडला आहे. या चित्रपटाची कहाणी चांगली असल्याचं तिनं मुलाखतीदरम्यान सांगितलं.

विद्या बालनचं वर्कफ्रंट : विद्या बालन 'दो और दो प्यार' या चित्रपटामध्ये प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंधील राममूर्ती यांच्याबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिर्षा गुहा ठाकुर्ता यांनी केलंय. हा चित्रपट एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरवर आधारित असणार आहे. याशिवाय ती कार्तिक आर्यनबरोबर 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, तृप्ती दिमरी, राजपाल यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हॉरर कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी यांनी केलंय. हा चित्रपट 2024च्या दिवाळीच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. सध्या या चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. आयुष्मान खुरानानं लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेच्या नवीन इमारतीला दिली भेट, फोटो व्हायरल - AYUSHMANN KHURRANA
  2. 'हनुमान' स्टार तेजा सज्जा त्याच्या आगामी 'सुपर योद्धा'चित्रपटासाठी सज्ज - Hanuman star Teja Sajja
  3. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंत आली त्याच्या समर्थनार्थ पुढे, व्हिडिओ व्हायरल - Rakhi Sawant
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.