ETV Bharat / entertainment

देवेंद्र फडणवीसांच्या गीताला शंकर महादेवनने दिला आवाज, संगीताच्या जगात उपमुख्यमंत्र्यांचे पदार्पण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 5:36 PM IST

Devadhi Dev song launch : देवेंद्र फणडवीस यांनी लिहिलेल्या 'देवाधि देव' या गीताला गायक शंकर महादेवन यांनी आवाज दिला असून या गीताला संगीतही दिलं आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही गीत टाइम्स म्युझिक स्पिरिच्युअलने लॉन्च केलं आहे.

Devadhi Dev song launch
देवाधि देव गाणे लॉन्च

मुंबई - Devadhi Dev song launch : महाराष्ट्रातले राजकारणाचे वातावरण निवडणुकीच्या आधी खूप तापलं आहे. एका बाजूला राजकीय धुळवड खेळण्याची तयारी सुरू झाली असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गीतकार म्हणून संगीताच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या लेखनीतून उतरलेल्या 'देवाधि देव' गाण्याला ग्रॅमी पुरस्कार विजेते शंकर महादेवन यांनी स्वर आणि संगीताचा साज चढवला आहे. टाइम्स म्युझिक स्पिरिच्युअलने हे खास गाणे महाशिवरात्री जवळ येत असताना लॉन्च केलं आहे. या गाण्यात स्वतः शंकर महादेवन अतिशय भक्तीनं महादेवाची आराधना करताना दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

देवेंद्र फडणवीस यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला, त्यांच्या मनस्वी आणि भावपूर्ण शब्दांनी भक्तीच्या एका नवीन शिखरावर नेऊन ठेवले आहे. हे गीत भगवान शंकराला खऱ्या अर्थाने वाहिलेली भावसुमनांजलीच ठरत आहे. "देवाधि देव", आज, 6 मार्च 2024 रोजी प्रदर्शित करून, टाइम्स म्युझिक स्पिरिच्युअलचे जगभरातील भक्तांच्या हृदयाला स्पर्श करण्याचे काम केलं आहे.

पद्मश्री पुरस्कार विजेते शंकर महादेवन या गाण्याबद्दल आपला उत्साह व्यक्त करताना म्हणाले, "देवेंद्रजींनी अतिशय सुंदरपणे लिहिलेले 'देवाधी देव' संगीतबद्ध करणे आणि गाणे हा एक सन्मान आहे. या गाण्यामधून भगवान शिवाचे सर्व गुणधर्म त्यांनी उत्तम प्रकारे विणलेले आहेत ज्यामुळे माझ्यातल्या संगीतकाराला आणि गायकाला त्यातील भक्तीचे पैलू समोर आणण्यासाठी खूप मदत झाली."

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "माझ्या कुटुंबात लहानपणापासून महाशिवरात्री साजरी केली जात आहे. शिवाच्या गुणविशेषांचा आणि शिवपुराणातील कथांचा माझ्यावर तेव्हापासूनच खूप प्रभाव पडला आहे. मी मागील वर्षी प्रवास करत असताना हे गीत अचानक मला सुचले. एक गायिका असल्याने, माझी पत्नी अमृता हिला गाणे म्हणून त्यातील क्षमता लक्षात आली आणि त्यांनी ते शंकरजींना शेअर केले. मला आनंद आहे की शंकरजींनी ते संगीतबद्ध करण्यास सहमती दर्शवली आणि इतके सुंदर गायले ही आहे. अमृता यांनी एक छोटासा भाग गायला आहे याचा मला आनंद आहे.”

अमृता फडणवीस आपला आनंद व्यक्त करताना म्हणाल्या, "'देवाधी देव' हे एक सुंदर गाणे आहे आणि मला आशा आहे की हे गाणे आपल्या भारतातील महाशिवरात्री उत्सवाचा एक भाग नक्कीच होईल."

टाइम्स म्युसिकचे "देवाधी देव"हे गाणे जागतिक स्तरावर सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

हेही वाचा -

1. कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी स्टारर 'आशिकी 3'वर दिलं टी- सीरीजनं स्पष्टीकरण

2. अजय देवगण स्टारर 'शैतान'नं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केलं उत्तम कलेक्शन

3. ऑस्कर 2024 अवॉर्ड्स कधी आणि कुठे पाहू शकता, घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.