ETV Bharat / entertainment

रक्तदान करुन अल्लु अर्जुन साजरा करतो आपला वाढदिवस - Allu arjun birthday

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 4:46 PM IST

Allu arjun birthday : अल्लू अर्जुनचा आज 8 एप्रिल रोजी 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष दिवशी तो रक्तदान करत असतो.

Allu arjun birthday
अल्लू अर्जुन वाढदिवस

मुंबई - Allu arjun birthday : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आज 8 एप्रिल रोजी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आता तो 'पुष्पा 2' चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत, या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचं फर्स्ट लूक समोर आल्यानंतर अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अल्लू अर्जुन हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जो दरवर्षी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करत असतो. याबद्दल त्यानं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

वाढदिवसाच्या दिवशी अल्लू अर्जुन करतो रक्तदान : अल्लू हा रक्तदान शिबिरे देखील आयोजित करतो, ज्यामध्ये त्याचे चाहते देखील रक्तदान करतात. मिळालेल्या माहिनुसार, अल्लू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग मुलांसाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होतो. 2020 मध्ये तिच्या वाढदिवशी त्यानं 'पुष्पा' या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला होता. आता यावेळी त्याच्या वाढदिवशी अर्जुनच्या 'पुष्पा 2'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अल्लू अर्जुनचा 2014 पासून 'फोर्ब्स इंडिया' सेलिब्रिटी 100 यादीत समावेश करण्यात आला आहे.

'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल : अल्लू अर्जुनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि तीन नंदी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अल्लू हा फक्त अभिनयातचं नाही तर तो गायन आणि नृत्यासाठी देखील पारंगत आहे. आता 'पुष्पा 2'चा टीझरही त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगदीश प्रताप बंदरी, अनसूया भारद्वाज, राव रमेश, सुनील, धनंजय आणि राज तिरंदासू हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलंय. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. याच दिवशी अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. रजनीकांत स्टारर 'वेट्टय्यान' चित्रपटाची नवीन पोस्टरसह झाली घोषणा - vettaiyan Movie
  2. अल्लू अर्जुन चाहत्यांना भेटण्यासाठी घराबाहेर पडला, व्हिडिओ व्हायरल - HAPPY BIRTHDAY ALLU ARJUN
  3. फिल्म इंडस्ट्रीतील उदयासह अधिराज्य गाजवणारा प्रतिभावान पॉवरहाऊस स्टार अल्लू अर्जुन - Allu Arjun Birthday
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.