ETV Bharat / entertainment

कॉन्सर्ट चालू असताना महिला फॅन झाली भावूक, गायक आतिफ अस्लमला मारली प्रेमाची मिठी - पाहा व्हिडिओ - atif aslam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 11:29 AM IST

Singer atif aslam : आतिफ अस्लमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला चाहती त्याच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

Singer atif aslam
गायक आतिफ अस्लम

मुंबई - Singer atif aslam : पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आतिफची गाणी भारतातच नाही तर परदेशातही खूप पसंत केली जातात. त्यानं आपल्या गाण्यांनी आणि आवाजानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान आतिफ अस्लमचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो एका महिला चाहतीची स्टेजवर समजूत घालताना दिसत आहे. त्याच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता हा व्हिडिओ पाहून अनेकजण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात, आतिफनं बांगलादेशात एक कॉन्सर्ट केला होता. स्टेजवर परफॉर्म करताना अचानक एक महिला चाहती त्याच्याकडे आली.

आतिफ अस्लमचा व्हिडिओ व्हायरल : आतिफ परफॉर्म करताना पाहून ती भावूक झाली आणि स्टेजवरच रडायला लागली. यानंतर आतिफनं त्या महिला चाहतीला मिठी मारली. ती महिला फॅन त्याला सोडायला तयार नव्हती. यानंतर या महिलेनं आतिफला शेकहॅन्ड केलं आणि त्याच्या हाताची किस घेतली. यानंतर त्या चाहतीनं त्याला लव्ह यू म्हटलं तर आतिफनं यावर सुंदर प्रतिक्रिया देत तिला लव्ह यू टू म्हटलं. ती चाहती सर्व सुरक्षा तोडून स्टेजवर आल्यानं तिथेल बॉडीगार्डनं महिलेला घट्ट पकडून स्टेजवरून सुखरूप खाली आणलं. दरम्यान या व्हिडिओवर एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, "तो संवेदनशीलतेनं भेटला." यानंतर आणखी एकानं लिहिलं, "आतिफ अस्लम त्याच्या चाहत्यांवर खूप प्रेम करतो." आता या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत.

वर्कफ्रंट : आतिफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'एलएसओ 90' चित्रपटाद्वारे जवळपास सात वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतत आहे. त्यानं बॉलिवूडमध्ये 'तेरा होने लगा हूँ', 'तेरे संग यारा', 'मैं रंग शरबतों का' आणि 'दिल दियां गल्ला', 'पिया ओ रे पिया' यासह अनेक गाणी गायली आहेत. दरम्यान त्यानं त्याच्या करिअरची सुरुवात 2004 पासून केली होती. तो अस्लम जल गटाचा सदस्य होता. यानंतर काही काळानंतर तो या गटापासून वेगळा झाला. त्यानं त्याचा पहिला अल्बम 'जल परी' हा रिलीज केला , जो खूप हिट ठरला. यानंतर दुसरा अल्बम 'मेरी कहानी' हा पण त्याचा प्रचंड गाजला. अस्लमनं अभिनेत्री माहिरा खानबरोबर 2011 च्या पाकिस्तानी चित्रपट 'बोल'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याशिवाय त्यानं हम टीव्हीवर जानेवारी 2022 मध्ये 'संग-ए-माह' या पाकिस्तानी मालिकेद्वारे टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं.

हेही वाचा :

  1. "यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही"; अभिनेता चिन्मय मांडलेकरनं का घेतला हा निर्णय? - Chinmay Mandalekar
  2. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'मधील अमिताभ बच्चनचं नवीन पोस्टर रिलीज, आज येईल मोठी अपडेट - AMITABH BACHCHAN KALKI 2898AD
  3. सलमान खान आणि संजय दत्तचा मुलगा शहरान दुबईमध्ये कराटे कॉम्बॅट इव्हेंटमध्ये दिसले एकत्र, व्हिडिओ व्हायरल - Salman Khan and Sanjay Dutt son
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.