ETV Bharat / entertainment

Shah Rukh Khan on Airport : शाहरुख खानचा शाही अंदाज, विमानतळावरील नवा लूक चर्चेत!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 12:54 PM IST

Shah Rukh Khan on Airport: शाहरुख खान रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. किंग खाननं आपल्या ब्लॅक लूकनं सर्वांचे यावेळी लक्ष वेधून घेतले.

Shah Rukh Khan on Airport
शाहरुख खान विमानतळावर

मुंबई - Shah Rukh Khan on Airport : अभिनेता शाहरुख खान त्याच्या फॅशननं चाहत्यांना नेहमीच प्रभावित करत असतो. कार्यक्रम असो की पार्टी, अनेकदा तो त्यांच्या स्टायलिश लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. आज सकाळी शाहरुख मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. आता त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये 'किंग खान' हा आपल्या कारमधून बाहेर पडत विमानतळाच्या प्रवेशद्वारकडे जाताना दिसत आहे. यावेळी शाहरुखनं जीन्ससह काळ्या रंगाची टी-शर्ट आणि त्यावर कोट घातलेला आहे. त्यानं त्याचे केसं हे पोनीटेलमध्ये बांधले आहे. या लूकमध्ये 'किंग खान' खूप सुंदर दिसत आहे. शाहरुख खानच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

'किंग खान'चा मुंबई विमानतळाचा ब्लॅक लूक : व्हायरल व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, ''बॉलिवूडचा किंग शाही अंदाज आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिल, ''बॉलिवूडमध्ये किंग खानसारखा कोणीचं नाही मी त्याचा खूप मोठा चाहता आहे.'' आणखी एकानं लिहिलं, ''शाहरुख खानचा लूक खूप सुंदर आहे.'' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. याआधी 'किंग खान' हा ग्लोबल सिंगर एड शिरीनबरोबर दिसला होता. त्यानं एडीला त्याची सिग्नेचर पोझ शिकवली होती. त्याचा हा व्हिडिओदेखील खूप सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

शाहरुख खानचं वर्क फ्रंट : किंग खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं रॅपर बादशाहच्या स्टुडिओत अल्बम 'एक था राजा' च्या अनाउंसमेंट व्हिडिओमध्ये आपला आवाज दिला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये बादशाहनं आपले 12 वर्षेही साजरे केले आहे. याशिवाय शाहरुख नुकताच 'डंकी' चित्रपटात दिसला होता. 'डंकी'मध्ये शाहरुख खानबरोबर बोमन इराणी, तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. किंग खानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अजून त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा :

  1. Ed Sheeran And Diljit Dosanjh: एड शिरीननं दिलजीत दोसांझबरोबर स्टेजवर गायलं पंजाबी गाणं, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का
  2. Pulkit And Kriti Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नातील फोटो व्हायरल
  3. राम चरणानंतर 'गेम चेंजर'मधील कियारा अडवाणीचा लूक लीक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.