मुंबई - Hiramandi The Diamond Bazaar : चित्रपट निर्माते आणि ख्यातनाम दिग्दर्शक संजय लीला भन्साळी 'हीरामंडी: द डायमंड बझार' ही नवी वेब सिरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. याबद्दल बोलताना भन्साळी यांनी या मालिकेला आपला सर्वात मोठा प्रोजेक्ट असल्याचं म्हटलंय.
याबद्दल बोलताना संजय लीला भन्साळी म्हणतात, मी अनेक भव्य आणि मोठे चित्रपट बनवले आहेत. मला चित्रपट मोठ्या स्केलवर बनवायला आवडतं आणि हे नैसर्गिकपणे माझ्याकडे आलंय. पण डिजीटल प्लॅटफॉर्मकडे वळताना मी तो दर्जा उचलला आहे. 'हीरामंडी' हा माझा सर्वात मोठा प्रकल्प आहे; मला ते खरोखरच खास बनवायचे होते आणि आता बनवल्यानंतर मी स्वतःच आश्चर्यचकित झालो आहे."
भन्साळी पुढे म्हणाले, "ही केवळ मालिका नाही; हे एक जग आहे आणि मी जगभरातील प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवरील 'हीरामंडी'च्या समृद्ध प्रवाहामध्ये स्वतःला विसर्जित करण्यासाठी उत्सुक आहे."'हीरामंडी: द डायमंड बझार' या वेब शोद्वारे संजय लीला भन्साळी ओटीटीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सेगल यांनी 'हीरामंडी'च्या दुनियेची एक एकत्रित मजबूत कास्ट तयार केली आहे.
ही मालिका हीरामंडी, लाहोर आणि अविभाजित, स्वातंत्र्यपूर्व भारताची पार्श्वभूमी असलेला आणि वसाहतविरोधी स्वातंत्र्य चळवळ उदयास येत असतानाच्या पार्श्वभूमीवरील सत्तासंघर्षावर आधारित आहे. इंस्टाग्रामवर फर्स्ट लूक शेअर करताना नेटफ्लिक्स इंडियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "भारतीय दिग्गज निर्माता संजय लीला भन्साळी यांची पहिली मालिका 'हीरामंडी: द डायमंड बझार'चा हा पहिला लूक आहे!"
'हीरामंडी' हा संजय लीला भन्साळींचा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे. याबद्दल बोलताना भन्साळी यांनी पूर्वी सांगितले होते की, "ही लाहोरच्या वेश्यांवर आधारित एक महाकाव्य, अशा प्रकारची पहिलीच मालिका आहे. ही एक महत्त्वाकांक्षी, भव्य आणि सर्वसमावेशक मालिका आहे; म्हणून ती बनवताना मी नर्व्हस असूनही उत्सुक आहे. मी नेटफ्लिक्स बरोबरची भागीदारी आणि हीरामंडीला जगभरातील प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी उत्सुक आहे."
हेही वाचा -