ETV Bharat / entertainment

चित्रीकरणादरम्यान सैफ अली खानला दुखापत, गुडघा आणि खांद्यावर झाली शस्त्रक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 11:54 AM IST

Updated : Jan 23, 2024, 2:14 PM IST

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानला काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Saif Ali Khan
सैफ अली खान

मुंबई - Saif Ali Khan : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. सैफ रुग्णालयात दाखल असल्याची बातमी समोर येत आहे. रुग्णालयात त्याच्या साथीला त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ अली खानचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाला होता. याच कारणामुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. सैफच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. ही शस्त्रक्रिया फारशी गंभीर नाही. आता सैफची तब्येत ठीक आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफनं माहिती दिली की, ''शस्त्रक्रिया चांगली झाली आहे. आता मी बरा आणि आनंदी आहे. सर्व चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद.'' दरम्यान त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सैफवर याआधी शस्त्रक्रिया झाली : सैफ बऱ्याच दिवसांपासून शस्त्रक्रिया पुढं ढकलत होता. सैफ अली खानची जखमी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो शूटिंग सेटवर अनेकदा जखमी झाला होता. 2016 मध्ये 'रंगून' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफच्या अंगठ्यालाही दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, मात्र ती शस्त्रक्रिया फारशी गंभीर नव्हती. सैफबद्दल बोलायचं झालं तर वयाच्या 53 व्या वर्षी तो चित्रपट क्षेत्रात सक्रिय आहे. तो आतापर्यंत शेवटचा 2023 मध्ये आलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटात दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटामध्ये त्यानं रावणाची व्यक्तिरेखा साकारली होती.

सैफ अली खानचं वर्कफ्रंट : आता पुढे तो हिंदी चित्रपट 'गो गोवा गॉन-2' मध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याचा तेलुगू चित्रपट 'देवरा' हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर दिसणार आहेत. 'देवारा'च्या निर्मात्यांनी नुकताच टीझर रिलीज केला होता, ज्यामध्ये एनटीआर हा अ‍ॅक्सन मोडमध्ये दिसला होता. समुद्र, जहाजं आणि रक्तपाताने भरलेल्या जगाची ओळख करून देणारा हा टीझर अनेकांना खूप आवडला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतला सिवा यांनी केलं असून अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिलं आहे.

हेही वाचा :

  1. अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर? विराट कोहली 2 सामन्यांच्या रजेवर गेल्याने चर्चांना उधाण
  2. श्रीराम मंदिरच्या उद्घाटन सोहळ्यातील आकाश अंबानी आणि श्लोकाचा फोटो झाला व्हायरल
  3. रणबीर-आलिया ते विकी-कतरिना स्टार कपल प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येत हजर
Last Updated :Jan 23, 2024, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.