ETV Bharat / entertainment

सिद्धार्थ मल्होत्राने नवीन पोस्टरसह 'योद्धा' चित्रपटाच्या ट्रेलरची वाढवली उत्कंठा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 2:15 PM IST

Yodha Trailer Release Buzz : 'योद्धा'चा ट्रेलर रिलीज होण्याआधी, सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या चाहत्यांना चित्रपटाच्या जबरदस्त पोस्टरसह ट्रीट केले. सिद्धार्थने चित्रपट 29 फेब्रुवारीला ट्रेलर रिलीज होणार असल्याचेही कळवले आहे. नवीन पोस्टरमध्ये चित्रपटातील सिद्धार्थच्या पात्राभोवती रचण्यात आलेल्या षड्यंत्राचे चित्र पाहायला मिळते.

Sidharth Malhotra
सिद्धार्थ मल्होत्रा

मुंबई - Yodha Trailer Release Buzz : सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर आगामी 'योद्धा' हा चित्रपट 15 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची टीम प्रमोशनच्या जोरदार तयारीत आहे. चित्रपटाच्या प्रीमियरपर्यंत 'योद्धा'ची टीम सकारात्मक पब्लिसिटीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. 'योद्धा'चा ट्रेलर अद्याप रिलीज झालेला नाही. त्याबद्दलची उत्सुकता वाढण्यासाठी सिद्धार्थने सोशल मीडियाचा वापर केला. 29 फेब्रुवारी रोजी ट्रेलरचे तीन दिवसात लॉन्चिंग केले जाईल याची आठवण करून देत त्याने स्वत: चे एक धक्कादायक पोस्टर लॉन्च केले आहे.

इंस्टाग्रामवर, सिद्धार्थने 'योद्धा'चे नवीन पोस्टर टाकले. प्रमोशनल इमेजमध्ये, तो लढाऊ मोडमध्ये दिसतो, उड्डाण आणि स्फोटाच्या पार्श्वभूमीवर बंदूक चालवताना, या चित्रपटातील संघर्षाची झलक दाखवण्याचा प्रयत्न पोस्टवर दिसत आहे. पोस्टरसोबतच, सिद्धार्थने कॅप्शन दिले आहे, "आकाशात, अशांततेच्या दरम्यान, योद्धा अ‍ॅक्शनसाठी तयार आहे! योद्धा ट्रेलर 29 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल! यो्धा 15 मार्च रोजी सिनेमागृहात." काही दिवासापूर्वी योद्धा चित्रपटाचे पहिले पोस्टर दुबईत उंच आकाशात लॉन्च करण्यात आले होते. हेलीकॉप्टरमधून उडी घेत काही पॅराशूटधारी तरुणांनी स्काय डायव्हिंग करुन हे पोस्टर हवेत लॉन्च केले होते. अनोख्या पद्धतीने लॉन्च झालेल्या या पोस्टर लॉन्चची मोठी चर्चा झाली होती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

विशेष म्हणजे, 'योद्धा'च्या नवीन पोस्टरवर चित्रपटातील सिद्धार्थच्या व्यक्तिरेखेभोवती रचण्यात आलेल्या षडयंत्राचे चित्र दिसत आहे. या चित्रपटाचे कथानक अतिरेक्यांनी प्रवासी विमान अपहरण करण्यावर केंद्रस्थानी ठेवले आहे. यामध्ये एक ऑफ-ड्युटी सैनिक अपहरणकर्त्यांना पराभूत करण्यासाठी आणि इंजिन निकामी झाल्यावर प्रवाशांने सुखरुप करण्यासाठी आपल्या शौर्याची बाजी लावताना दिसतो.

'योद्धा'च्या ट्रेलरची अपेक्षा वाढली असताना, निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपटाचा टीझर आणि 'जिंदगी तेरे नाम' या गाण्याने प्रेक्षकांना खूश केले. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे निर्मित, योद्धा सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा या जोडीने दिग्दर्शित केला आहे आणि सागरने पटकथा हाताळली आहे. 'शेरशाह', 'मिशन मजनू' आणि ओटीटी मालिका 'इंडियन पोलीस फोर्स'च्या यशानंतर देशभक्तीपर शैलीतील योद्धा हा सिद्धार्थचा आणखी एक चित्रपट आहे.

हेही वाचा -

  1. अभिनेत्री तब्बूने केकसह क्रूचे शूटिंग पूर्ण झाल्याची केली घोषणा
  2. सामंथाची फिल्म इंडस्ट्रीत 14 वर्षे, समकालीन नयनताराने दिल्या शुभेच्छा
  3. आलिया आणि रणबीरची मुलगी राहा कपूर कुटुंबामध्ये कोणासारखी दिसते, यावर महेश भट्टने केला खुलासा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.