ETV Bharat / entertainment

Magadheera to Rerelease : राम चरणचा ब्लॉकबस्टर 'मगधीरा' त्याच्या 39 व्या वाढदिवसाच्या आधी थिएटरमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 5:27 PM IST

Magadheera to Rerelease : राम चरणच्या अभिनय पदार्पणाचा 2009 मधील 'मगधीरा' हा चित्रपट चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित आहे. रामचरणच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी हा चित्रपट झळकणार असल्याने त्याचे चाहते 15 वर्षापूर्वीचा थरारक अनुभव पुन्हा एकदा घेऊ शकतील.

Ram Charan
राम चरण

मुंबई - Magadheera to Rerelease : दक्षिण भारतीय स्टार राम चरण सध्या यशाचा शिखरावर आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन तेलुगू भाषिक राज्यामध्ये त्याची लोकप्रियता अफाट आहे. वडील चिंरजीवी प्रमाणेच त्यानेही आपली वेगळी ओळख आणि फॉलोअर्स निर्माण केले आहेत. आजच त्याने त्याच्या 16 व्या चित्रपटाचा मूहूर्त केला. त्याच्या चाहत्यांच्या आनंदासाठी एक खास बातमी आहे. त्याचा पदार्पणाचा 2009 मध्ये आलेला 'मगधीरा' हा एसएस राजामौली दिग्दर्शित चित्रपट आता पुन्हा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 26 मार्च रोजी, राम चरणच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होणार आहे. या विशेष स्क्रीनिंगचा उद्देश तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील त्याच्या चाहत्यांना खूश करण्याचा आहे.

या री-रिलीजमधून राम चरणच्या चाहत्यांना नॉस्टॅल्जिक अनुभव घेता येणार आहे आणि लोक पुन्हा एकदा 15 वर्षानंतर 'मगधीरा' चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहू शकतील. राम चरण, काजल अग्रवाल, श्रीहरी, देव गिल आणि सुनील यासह इतर कलाकारांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाला एमएम कीरावानी यांनी मंत्रमुग्ध करणारे संगीत दिले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'मगधीरा'चे मोठ्या पडद्यावर भव्य पुनरागमन होण्याबरोबरच राम चरणच्या वाढदिवसानिमित्त चाहते त्याच्याकडून काही खास वाढदिवस भेटीची अपेक्षा करु शकतात. एक बहुप्रतीक्षित अपडेट त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'गेम चेंजर'मधून दिली जाऊ शकते. या चित्रपटातील गाण्याचा ट्रॅकही या निमित्तानं लॉन्च केला जाऊ शकतो.

राम चरण सध्या 'गेम चेंजर'च्या शुटिंगमध्ये व्यग्र असून, शंकर दिग्दर्शित हा राजकीय नाट्यमय चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटानंतर, त्याने दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्यासोबत 'आरसी16' नावाच्या त्याच्या पुढील चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात केली आहे. यामध्ये जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असेल. या चित्रपटाची विधीवत मुहूर्त पूजा आज आदल्या दिवशी पार पडली.

हेही वाचा -

  1. RC 16 pooja ceremony : राम चरण स्टारर 'आरसी 16'च्या मुहूर्ताला स्टार कास्टसह दिग्गज स्टार्सची उपस्थिती
  2. Ilaiyaraaja biopic : संगीतकार इलैयाराजा यांच्या बायोपिकची घोषणा, धनुष साकारणार संगीताच्या जादुई 'मॅस्ट्रो'ची भूमिका
  3. Thalapathy Vijay : 'गोट'च्या शुटिंगसाठी केरळमध्ये आलेल्या थलपथी विजयला पाहायला आले लाखोच्या संख्येत चाहते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.