ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं जोनास, मुलगी मालती मेरीसह घेतला सुट्टीचा आनंद, शेअर सुंदर झलक - Priyanka Chopra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 10:40 AM IST

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रानं अलीकडेच मुलगी मालती मेरी आणि पती निक जोनास यांच्याबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात 'देसी गर्ल' आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसत आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा

मुंबई - Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ती तिच्या व्यग्र शेड्यूलमधून कुटुंबाबरोबर अनेकदा वेळ घालवताना दिसते. प्रियांका आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिनं आणि स्वित्झर्लंडमधील शूट आणि प्रवासाची झलक शेअर केली आहे. आता तिनं आपल्या व्यग्र शेड्यूलमधून ब्रेक घेतला. ती क्रॅन्स-मॉन्टानामधील सुंदर निसर्गाच्या सानिध्यात पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससह या सुंदर सहलीचा आनंद घेताना दिसत आहे.

प्रियांका चोप्रानं शेअर केला व्हिडिओ : शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला निक जोनास घरातील थंड तापमानात उष्णता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर मालती ही बागेत फिरत आहे. यानंतर प्रियांका मालती मेरीला फिरायला घेऊन, तिच्याबरोबर आईस्क्रीमचा आनंद घेत आहे. याशिवाय पुढं ती शूटसाठी सराव करत आहे. तसेच प्रियांकानं तिच्या कारच्या खिडकीतून सुंदर निसर्गाची झलकही दाखवली आहे. यानंतर मालती एकटीच चमच्यानं चॉकलेट डिश चाखताना दिसत आहे. तसेच मालती प्रियांकाच्या सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना प्रियांकानं लिहिलं, 'जीवनात अलीकडे...' प्रियांकाच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

चाहत्यांना केलं कौतुक : तिनं शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. एका चाहत्यानं या व्हिडिओवर कमेंट करत लिहिल, " हा व्हिडिओ मी खूपदा पाहात आहे. प्रियांका लग्नानंतर खूप चांगलं आयुष्य जगत आहे." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "खूप सुंदर कुटुंब आहे." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "मालती मला खूप आवडते. ती खूप सुंदर दिसते." याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 'देसी गर्ल' सध्या 'हेड्स ऑफ स्टेट्स'ची शूटिंग करत आहे. पुढं प्रियांका फ्रँक ई. फ्लॉवर्स दिग्दर्शित 'द ब्लफ'मध्ये देखील दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर कार्ल अर्बनदेखील असणार आहे.

हेही वाचा :

  1. मतदान संपताच मुंबईला आल्यानं अरुण गोविल टीकेची धनी, सारवासारव करत म्हणाले... - Arun Govil
  2. पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्तानं कानशीलात का लगावली? आमिरनं कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितलं कारण - aamir khan
  3. 'पुष्पा 2' ते 'कल्की 2898 एडी'पर्यंत 'या' दक्षिणेकडील चित्रपटांची प्रेक्षकांना आहे प्रतिक्षा - upcoming most awaited south movies
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.