ETV Bharat / entertainment

बिपाशा बसूला यंग लीडर्स फोरमतर्फे प्राईड ऑफ बंगाल पुरस्कारानं केलं सन्मानित, फोटो व्हायरल - Bipasha Basu

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 5:09 PM IST

Bipasha Basu Pride of Bengal: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूला यंग लीडर्स फोरमतर्फे प्राईड ऑफ बंगाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. आता तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Bipasha Basu
बिपाशा बसू

मुंबई - Bipasha Basu Pride of Bengal : अभिनेत्री बिपाशा बसू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती आपल्या पती आणि मुलीसह सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते. दरम्यान अलीकडेच तिनं एका पुरस्कार सोहळ्यामधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. बिपाशाला यंग लीडर्स फोरमतर्फे प्राईड ऑफ बंगाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. रविवारी 21 एप्रिल रोजी बिपाशानं प्राइड ऑफ बंगाल फंक्शनमधील काही फोटो शेअर करत लिहिलं, 'या सन्मानासाठी धन्यवाद प्राइड ऑफ बंगाल.' फोटोमध्ये बिपाशा ही काही लोकांबरोबर पोझ देत आहे.

बिपाशा बसूला मिळाला प्राईड ऑफ बंगालचा पुरस्कार : आता बिपाशाला प्राइड ऑफ बंगालच्या आयकॉनिक लेडी श्रेणीसाठी पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे चाहते खूप खुश आहेत. बिपाशाच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "अभिनंदन बिपाशा तुझ्यावर मला खूप अभिमान आहे, अशीच प्रगती करत राहा." दुसऱ्या एकानं लिहिलं,"बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कलाकार." आणखी एकानं लिहिलं, "बिपाशाला कुठल्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळत आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

बिपाशा बसूचं लूक : या कार्यक्रमासाठी बिपाशानं रॉयल ब्लू कलरची साडी निवडली होती. तसेच तिनं तिचे केस एका अंबाड्यात बांधले असून यावर गजरा लावला होता. कानातले आणि निळ्या बिंदीसह तिनं तिचा लूक पूर्ण केला होता. या लूकमध्ये ती खूप आकर्षक दिसत होती. दरम्यान बिपाशानं 2001 मध्ये 'अजनबी' या हिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिनं 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा 'राझ', 'जिस्म', 'नो एंट्री', 'फिर हेरा फेरी', 'कॉर्पोरेट', 'बचना ए हसीनो' असे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. ती शेवटी 2015 मध्ये तिचा पती करण सिंग ग्रोव्हरबरोबर 'अलोन' या हॉरर चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा :

  1. सलमान खान आणि संजय दत्तचा मुलगा शहरान दुबईमध्ये कराटे कॉम्बॅट इव्हेंटमध्ये दिसले एकत्र, व्हिडिओ व्हायरल - Salman Khan and Sanjay Dutt son
  2. शाहरुख खानची लेक सुहाना खाननं तिच्या इटली व्हेकेशनमधील फोटो केले शेअर - Suhana Khan share pics
  3. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चननं 17 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला कौटुंबीक फोटो - Aishwarya Rai and Abhishek Bachchan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.