ETV Bharat / entertainment

'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाचा ट्रेलर सलमान खान आणि राम चरणने केला लॉन्च

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 1:49 PM IST

Operation Valentine movie trailer : वरुण तेज आणि मानुषी छिल्लरची भूमिका असलेला बहुप्रतीक्षित 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाचा ट्रेलर सलमान खान आणि राम चरण यांनी लॉन्च केला आहे. थरारक हवाई कसरती असलेल्या या ट्रेलरमध्ये पराक्रमी जेट पायलटची थरारक शौर्यकथा पाहायला मिळते.

Operation Valentine
ऑपरेशन व्हॅलेंटाईन

मुंबई - Operation Valentine movie trailer : अभिनेता वरुण तेज आणि मानुषी छिल्लरची भूमिका असलेल्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाचा ट्रेलर सलमान खान आणि राम चरण यांनी लॉन्च केला आहे. शक्ती प्रताप सिंग हड्डा दिग्दर्शित हा चित्रपट 1 मार्च रोजी तेलुगू आणि हिंदा भाषेत रिलीज होणार आहे. देशभक्तीपर थ्रिलर चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा बऱ्याच काळापासून सुरू होती.

यामध्ये अभिनेता वरुण तेज आणि मानुषी छिल्लर एअरफोर्स फायटर पायलटच्या भूमिकेत आहेत. 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या चित्रपटाबद्दल बोलायचे तर हवाई दलातील वीरांच्या शौर्य आणि पराक्रमाभोवती याचे कथानक गुंफण्यात आले आहे. देशाचे रक्षण करताना हवाई दलातील सैनिक कशा प्रकारच्या आव्हांनाचा मुकाबला करतात आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतात याचे थरारक चित्रण या चित्रपटात पाहायला मिळेल. सत्य घटनांपासून प्रेरित 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'चे दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंग हाडा यांनी केले आहे.

निर्मात्यांनी नुकतेच 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'च्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले आहे. यापूर्वी रिलीज झालेला टीझर आवडल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले होते. हिंदी आणि तेलुगू अशा दोन भाषांमध्ये चित्रीत झालेला हा चित्रपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आले होतो. अखेर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' हा चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' एक बहुप्रतिक्षित देशभक्तीपर थ्रिलर चित्रपट आहे. साऊथ स्टार वरुण तेज आणि माजी मिस वर्ल्ड विजेती सौंदर्यवती अभिनेत्री मानुषी छिल्लर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट शौर्याची एक वेगळी गाथा प्रेक्षकांच्या समोर उलगडणार आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुहानी शर्मा सामील झाली आहे. या चित्रपटात ती तान्या शर्मा हे पात्र साकारत असून भारतीय वायुसेना विभागाची लढाऊ सदस्य म्हणून ती शत्रूशी लढताना दिसेल.

हेही वाचा -

  1. फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन 3' चित्रपटामध्ये कियारा अडवाणीची एंट्री
  2. बबिता फोगटने 'दंगल' फेम सुहानी भटनागरच्या प्रार्थना सभेला हजेरी लावली; केला शोक व्यक्त
  3. मायोसिटिसचे निदान होण्यापूर्वीचे एक वर्ष अत्यंत अशांत होते, सामंथाचा खुलासा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.