ETV Bharat / entertainment

मिस वर्ल्डसाठी भारतात येणाऱ्या स्पर्धकांच्या पाहुणचारासाठी मानुषी छिल्लर उत्साही

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 10:14 AM IST

Former Miss World Manushi Chhillar : 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा 18 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान भारतात होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या जगभरातील स्पर्धकांना भारताचे आदरातिथ्य दाखवण्यासाठी माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर उत्साहित झाली आहे.

Manushi Chhillar
मानुषी छिल्लर

नवी दिल्ली - Former Miss World Manushi Chhillar : भारतामध्ये 28 वर्षांनंतर 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा 18 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपमसह विविध ठिकाणी होणार आहे. यासाठी भारतीय सौंदर्यवतींसह माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर याबद्दल खूप उत्साही आहे. याबद्दल बोलताना मानुषी म्हणाली की, जगाला भारताचे आदरातिथ्य जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.

"मी उत्साहित झाली आहे, ही खूप भारी गोष्ट आहे की इतक्या मुली भारतात येतील आणि त्या भारतात मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल बोलतील. जसा मी सहा वर्षापूर्वी झालेल्या स्पर्धेच्या दरम्यान भारताची प्रतिनिधी म्हणून अनुभव घेतला होता. त्या आपल्या सोशल मीडियावरुन त्यांचा अनुभव पोस्ट करणार आहेत. त्यांचे फॅन फॉलोइंग मोठे असल्यामुळे त्या लोकांनाही हे कळेल. त्यांचे कुटुंबीय आणि टीमही येणार आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक देशांमध्ये एक्स्पोजर मिळेल.,” असे मानुषीने एएनआयला सांगितले.

राजधानीतील प्री-लाँच इव्हेंटमध्ये मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का, माजी मिस वर्ल्ड, टोनी अ‍ॅन सिंग, व्हेनेसा पोन्स डी लिओन आणि स्टेफनी डेल व्हॅले यांच्यासह मानुषी छिल्लर उपस्थित होती.

मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकल्यानंतर, मानुषीने अभिनयातही प्रवेश केला आणि अक्षय कुमार सोबत 'सम्राट पृथ्वीराज' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ही तिच्यासाठी चांगली सुरुवात होती आणि नंतर ती 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटामध्ये दिसली होती.

तिला चांगले प्रोजेक्ट्स मिळत असले तरी अभिनयाच्या दुनियेत येणे तिच्यासाठी इतके सोपे नव्हते. तिच्या अनुभवावर विचार करताना, तिने मान्य केले की या क्षेत्रात बाहेरचे वाटण्यापासून ते घरचे वाटण्यापेक्षा तिला अभिनयाचे कौशल्य अधिक जवळचे वाटते.

याबद्दल बोलताना ती म्हणाली, "अर्थात, मला याबद्दल काहीही माहित नव्हते, म्हणून मला मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करावी लागली, मला फिल्म इंडस्ट्री समजून घ्यावी लागली, मला एक अभिनेत्री म्हणून माझे काम समजून घ्यावे लागले, मला माझ्या कलाकृतीवर काम करावे लागले, जो मी अजूनही चालू ठेवते आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक चित्रपटासोबत तुम्ही वाढता, त्यामुळे हा एक प्रवास आहे, 1 मार्चला येणारा हा फक्त तिसरा चित्रपट आहे. त्यामुळे 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' किंवा खरं तर, मी काम केलेल्या प्रत्येक चित्रपटात काहीतरी शिकत होते. आज मला जरा जास्तच वाटतं की मी या इंडस्ट्रीशी संबंधित आहे, आधी मला मी बाहेरची व्यक्ती असल्यासारखे वाटायचे, पण आता मी हळूहळू त्याचा भाग बनत आहे."

मानुषी छिल्लर सध्या वरुण तेज अभिनीत तिच्या आगामी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाची वाट पाहत आहे. हिंदी आणि तेलुगू अशा दोन भाषांमध्ये याचे शूटिंग झाले आहे. मानुषीने तिला माहित नसलेल्या भाषेत संवाद बोलण्याच्या अडचणींबद्दल सांगितले आणि द्विभाषिक चित्रपटाचे चित्रीकरण करतानाचा तिचा अनुभव मांडला. सुरुवातीच्या येणाऱ्या अडचणींना न जुमानता तिने ते पटकन शिकून घेतले. "चित्रपटात काम करताना खूप मजा आली. पण मला माहित नसलेल्या भाषेत संवाद म्हणायचे होते कारण चित्रपट दोन भाषांमध्ये शूट झाला होता. मला माझ्या सहकलाकारांसोबत काम करताना खूप मजा आली. वरुण हा मी आजवर काम केलेल्या सर्वोत्कृष्ट लोकांपैकी एक आहे, आणि अर्थातच, मला दक्षिणेतील खाद्यपदार्थ आणि त्यांचा आदरातिथ्य आवडतो," असे मानुषी म्हणाली.

तिच्या भविष्यातील चित्रपटाबद्दल आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ'बद्दल बोलताना ती म्हणाली, "अनेक प्रोजेक्ट प्रतीक्षेत आहेत, तथापि, अद्याप अधिकृत घोषणेची वाट पाहत आहे. मला माहित नाही की मी 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये आहे की नाही. मला आशा आहे की मी आहे, एवढेच मी म्हणू शकते."

71 वी मिस वर्ल्ड 18 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपमसह विविध ठिकाणी होणार आहे. जगभरातील देशांमधून एकूण 120 स्पर्धक विविध स्पर्धांमध्ये आणि चॅरीटी उपक्रमांमध्ये सहभागी होतील, ज्यामुळे ते बदलाचे दूत बनतील. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 71व्या मिस वर्ल्डचा समारोप होणार आहे.

हेही वाचा -

  1. 90 वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह, 7 वर्षांनी नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला
  2. सारा अली खानने आई अमृता सिंगच्या वाढदिवसानिमित्त लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
  3. चित्तथरारक 'क्रॅक'चा ट्रेलर रिलीज, विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपालची जबरदस्त अ‍ॅक्शन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.