ETV Bharat / entertainment

प्लॅस्टिक सर्जरीनं मंदिरा बेदींच्या चेहऱ्यात मोठा बदल; चाहत्यांना बसला धक्का - Mandira Bedi New Look

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 2:57 PM IST

Updated : Apr 7, 2024, 6:30 PM IST

Mandira Bedi New Look: मंदिरा बेदीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यात बदल झाल्यासारखा दिसत आहे.

Mandira Bedi New Look
मंदिरा बेदीचा नवीन लूक

मुंबई Mandira Bedi New Look : अभिनेत्री मंदिरा बेदी बऱ्याच दिवसापासून पडद्यावरुन गायब आहे. मात्र ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मंदिरा नेहमीच तिच्या चाहत्यांना तिच्या फिटनेसमुळे प्रभावित करत असते. मंदिराच्या फिटनेसबद्दल चाहतेही तिचे कौतुक करतात. आता यावेळी मंदिरानं एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा थोडा बदललेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती वाढत्या वयाबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओवर यूजर्स कमेंट्स करुन तिला आता ट्रोल करत आहेत.

मंदिरा बेदीच्या चेहऱ्यात बदल : तिनं चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली असल्याचा आता अनेकजण अंदाज लावत आहेत. या व्हिडिओच्या पोस्टवर एका युजरनं लिहिलं, ''तुमचा चेहरा वेगळा दिसत आहे.'' दुसऱ्या युजरनं लिहिलं, ''चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली का?'' आणखी एकानं लिहिलं, ''अरे यार, तू काय केलेस? तू खूप सुंदर होतीस.'' आता अनेकजण शस्त्रक्रिया चुकीची झाली असल्याचं तिला सांगताना दिसत आहेत. मंदिरा बेदीवर शस्त्रक्रिया झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र तिच्या चेहऱ्यामध्ये खूप बदल झाला आहे.

मंदिरा बेदी वर्कफ्रंट : मंदिराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिनं टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. मंदिरा पहिल्यांदा दूरदर्शनवरील 'शांती' या मालिकेत दिसली होती. तिला खरी ओळख शाहरुख खान आणि काजोल स्टारर 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तिनं छोटीशी भूमिका केली होती, जी अनेकांना आवडली होती. यानंतर ती अनेक चित्रपट आणि शोमध्ये झळकली. याशिवाय मंदिरा बेदी खूप चांगली होस्ट देखील आहे. तिनं शो व्यतिरिक्त अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये कॉमेंट्रीही केली आहे. 2021 मध्ये मंदिरा बेदीच्या पतीचे निधन झाले. यानंतर ती खूप दु:खात होती. काही दिवस ती सोशल मीडियापासून दूर होती. या काळात तिला अनेकांनी पाठिंबा दिला होता.

हेही वाचा :

  1. करीना कपूरनं स्वत:ला 'दिलजीत गर्ल फॉरेव्हर' म्हटल्यानंतर सोशल मीडियाात चर्चेला उधाण - KAREENA KAPOOR AND DILJIT DOSANJH
  2. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जॅकी भगनानीच्या घराबाहेर नवीन कारसह झाले स्पॉट, व्हिडिओ व्हायरल - Ranbir Kapoor and Alia Bhatt
  3. रश्मिका मंदान्नानं चालवला धनुष्यबाण, पाहा व्हिडिओ - Rashmika Mandanna
Last Updated :Apr 7, 2024, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.