ETV Bharat / entertainment

'क्रू'च्या निर्मात्यांनी दिली प्रेक्षकांना बेस्ट ऑफर, आता पाहा 150 रुपयांमध्ये चित्रपट - crew zing offer

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 6:51 PM IST

Crew Offer : 'क्रू'च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक सुंदर ऑफर दिली आहे. आता हा चित्रपट 150 रुपयांमध्ये चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Crew Offer
क्रूची ऑफर

मुंबई - Crew Offer : चित्रपटगृहात 29 मार्चला प्रदर्शित झालेला 'क्रू' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडल्याचं दिसतय. या चित्रपटामध्ये करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या तिन्ही अभिनेत्रींनी या चित्रपटामध्ये धमाकेदार अभिनय केलाय. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. 'क्रू' चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला फक्त 150 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 'क्रू'च्या निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं आहे की कोणत्याही सिनेमा हॉलमध्ये 'क्रू' चित्रपटाची तिकिट किंमत 150 रुपये असेल.

'क्रू'च्या निर्मात्यांनी केली घोषणा : 'क्रू' चित्रपटात करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू व्यतिरिक्त पंजाबी अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ आणि कॉमेडियन कपिल शर्मा आहेत. 'क्रू'च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक उत्तम ऑफर आणलीय. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवर लिहिलं, "तुमच्या 'क्रू'ला एका अविश्वसनीय ऑफरसाठी एकत्र करा ही ऑफर तुम्हाला चुकवायची नाही. फक्त 150 रुपयांमध्ये चित्रपटगृहांमध्ये या मजेदार फ्लाइटचा अनुभव घ्या." आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दल घोषणा करताच चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. या पोस्टवर अनेकजण आता आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये पाहण्यासाठी जाणार असल्याचं म्हणताना दिसत आहेत.

'क्रू'ची बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी : करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन स्टारर 'क्रू' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं देशांतर्गत पहिल्या दिवशी 9.25 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन आतापर्यंत 69.1 कोटीचं झालं आहे. या चित्रपटामध्ये करीना, क्रिती, तब्बू एअर होस्टेसच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या कहाणीत या तिघींना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो त्यानंतर त्यांना मृत प्रवाशाच्या अंगावर सोने सापडते. मग तिघांच्याही आयुष्यात अनेक ट्विस्ट आणि टर्न येतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केलंय. बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा :

  1. उर्वशी रौतेलानं जिममधून शेअर केला ज्युनियर एनटीआरबरोबरचा सेल्फी, वाचा युजर्सच्या प्रतिक्रिया - Urvashi Rautela
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ' जगभरात पाचव्या दिवशी करणार 100 कोटींचा टप्पा पार - bade miyan chote miyan
  3. जेलमधून सुटल्यानंतर 22 दिवसांनी एल्विश यादवनं खरेदी केली करोडोंची आलिशान कार, पाहा व्हिडिओ - Elvish Yadav
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.