ETV Bharat / entertainment

संजय लीला भन्साळी यांनी 'हिरामंडी'साठी उभारला कारकिर्दीतील सर्वात भव्य सेट - heeramandi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 5:14 PM IST

Heeramandi Set : संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' वेब सीरीजचा भव्य सेट सध्या खूप चर्चेत आला आहे. याबद्दल भन्साळी यांनी दिलखुलास गप्पा मारताना अनेक खुलासे केले आहेत.

Heeramandi Set
हिरामंडी सेट

मुंबई - Heeramandi Set : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या चित्रपटातील भव्य सेटसाठी ओळखले जातात. 'हिरामंडी - द डायमंड बाजार'मधील सेट सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान या वेब सीरीजची गाणी आणि ट्रेलर पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, संजय लीला भन्साळी यांनी आपल्या प्रतिभेनं खूप सुंदर सेट उभा केला आहे. एका मुलाखतीत संजय लीला भन्साळी हे सेटच्या प्रश्नावर मनमोकळेपणाने बोलले आहेत. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, "आतापर्यतच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात मोठा 'हीरामंडी'चा सेट आहे. हा सेट 3 एकरांवर बांधला गेला आहे. 60 हजारांहून अधिक लाकडी फळ्यांपासून बनवलेला हा सेट आहे. हे बांधण्यासाठी 700 कामगारांना 7 महिने काम केलं आहे.

'हिरामंडी'चा सेट कसा आहे? : या वेब सीरीजचा ट्रेलर पाहिला नसेल तर एकदा नक्की पाहा. या सुंदर सेटमध्ये काही खोल्या, एक पांढरी मशीद, मोठे अंगण, पाण्याचे कारंजे, राजे-महाराजांच्या काळामधील फोटो रस्ते, दुकाने, वेश्यालये आणि एक हम्माम रूम देखील आहेत. या वेब सीरीजचा सेट हा खूप भव्य आहे. याशिवाय सेटवरच्या खिडक्यांवर चांदीचे काम, फरशीवर मीनाकारी नक्षीकाम, बारीर कोरलेले लाकडी दरवाजे या सर्व गोष्टी भन्साळी यांच्या देखरेखीखाली करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. या मुलाखदरम्यान संजय लीला भन्साळी यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. 'हिरामंडी' बनवण्याची त्याच्या मनात 18 वर्षांपासून इच्छा होती हे त्यांनी उघड केलं. हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

'हीरामंडी'ची कहाणी आणि स्टार कास्ट : वेब सीरीजच्या कहाणीबद्दल सांगायचं झालं तर, ही वेब सीरीज ब्रिटीश काळात भारतातील लाहोरमधील गणिकांच्या आयुष्यावर आधारित आहे, जे स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढताना दिसणार आहेत. या वेब सीरीजच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर शेखर सुमन, अध्यायन सुमन, फरदीन खान, शर्मीन सहगल, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. ज्येष्ठ गायिका उषा उथुप यांनी पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल केला आनंद व्यक्त - Usha Uthup
  2. हृतिक रोशनचा डान्स बघून मनोज वाजपेयीच्या नृत्य करण्याच्या स्वप्नाचा झाला चुराडा - MANOJ BAJPAYEE
  3. आरती सिंहच्या हळदी समारंभामधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल - Arti singh Haldi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.