ETV Bharat / entertainment

नुपूर शिखरेनं पत्नी आयरा खानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, केली पोस्ट शेअर - nupur shikhare wishes wife ira khan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 3:51 PM IST

Nupur Shikhare and Ira Khan : आमिर खानची मुलगी आयरा खान आज 27 वर्षांची झाली आहे. आता तिच्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी तिला पती नुपूर शिखरेनं पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Nupur Shikhare and Ira Khan
नुपूर शिखरे आणि आयरा खान (इरा खान(nupur_popeye- nstagram))

मुंबई - Nupur Shikhare and Ira Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानसाठी आजचा दिवस मोठा आहे. आज 8 मे रोजी त्यांची लाडकी मुलगी आयरा खानचा वाढदिवस आहे. आज आयरा 27 वर्षांची झाली आहे. तिनं चालू वर्षी तिचा जिम ट्रेनर बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर राजस्थानमधील उदयपूरमध्ये लग्न केलं होतं. हा विवाह सोहळा खूप भव्य होता. या विवाहात अनेक स्टार्सनं हजेरी लावली होती. दरम्यान आयराच्या वाढदिवसानिमित्त तिला पती नुपूर शिखरेनं खास पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. नुपूरनं सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या लग्नाच्या उत्सवाची झलक दिसत आहे.

नुपूर शिखरेनं दिल्या आयरा खानला शुभेच्छा : या फोटोवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "हॅपी बर्थडे माय लव्ह, आई लव यू सो मच " नुपूरनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. यावर त्यानं आयरा खानचा लाल लग्नाचा स्कार्फ खांद्यावर घेतला आहे. दरम्यान आयराच्या हाताला मेहेंदी असून ती काळ्या पॅन्टसह लाल रंगाच्या लेहेंगा ब्लाउजमध्ये दिसत आहे. दोघेही फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. आयरा अनेकदा सोशल मीडियावर आपल्या पतीबरोबरचे फोटो शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर 6 लाख 55 हजार फॉलोअर्स आहेत. याशिवाय ती अनेकदा मानसिक आरोग्याबद्दल चाहत्याबरोबर बोलत असते.

आयरा खान आणि नुपूर शिखरेची प्रेमकहाणी : कोरोना लॉकडाऊनच्या काळात नुपूर शिखरे आमिर खानच्या घरी राहून त्याच्या फिटनेसचे लक्ष्य देत होता. या काळात आयरा खान देखील आमिरबरोबर राहात होती. यादरम्यानचं या दोघांनामध्ये जवळीकता वाढली. यानंतर दोघांनी एकामेंकाना डेट करण्यास सुरुवात केली. या जोडप्यानं 2020 रोजी साखरपूडा केला होता. दरम्यान नुपूर हा अनेक स्टार्सचा फिटनेस ट्रेनर राहिला आहे. तो अभिनत्री सुष्मिता सेनचा देखील ट्रेनर होता. तो आपल्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे नियमितपणे आपल्या वर्कआउट्सबद्दल व्हिडिओ आणि फोटो शेअर करून लोकांना फिटनेसबद्दल माहिती देत असतो.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोण, बिग बी आणि इरफान खान स्टारर 'पिकू'ला नऊ वर्षे पूर्ण - deepika padukone
  2. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील फर्स्ट लूक रिलीज - janhvi kapoor and rajkummar rao
  3. "मराठी लोकांबद्ल भेदभावानं वागणं चिंताजनक" : मंगेश देसाईंची रोखठोक प्रतिक्रिया - Ghatkopar Marathi case
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.