भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती, 'अशी' केली होती देशातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती - DADASAHEB PHALKEB BIRTH ANNIVERSARY

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 59 minutes ago

Dadasaheb Phalke birth anniversary

Dadasaheb Phalke birth anniversary : आज दादासाहेब फाळके यांची जयंती आहे. या विशेष प्रसंगी आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

मुंबई - Dadasaheb Phalke birth anniversary : हिंदी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1970 साली झाला. दादासाहेब फाळके हे दिग्दर्शक तसेच सुप्रसिद्ध निर्माता आणि पटकथा लेखक होते. त्यांच्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टी अस्तित्वात आली. दादासाहेब फाळके यांचे खरं नाव धुंडिराज गोविंद फाळके होतं.

दादासाहेब फाळके यांनी 19 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत 95 फीचर फिल्म्स आणि 26 शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या. त्यांचे वडील शास्त्री फाळके हे संस्कृतचे अभ्यासक होते. दादासाहेब फाळके यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. त्यामुळे ते जेजे कॉलेज ऑफ आर्ट, मुंबई आणि कला भवन, बडोदा येथे शिकले.

'राजा हरिश्चंद्र' पहिला चित्रपट : सुरुवातीला त्यांनी फोटोग्राफर म्हणून काम केलं. मात्र त्यांना हे काम आवडले नाही. दादासाहेब फाळके हे मित्रांकडून पैसे घेऊन ते लंडनला गेले. तेथून चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकून काही आवश्यक मशिन्स घेऊन भारतात परतले. यानंतर त्यांनी 'फाळके फिल्म कंपनी' स्थापन केली. या कंपनीकडून त्यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. या चित्रपटाच्या निर्मितीला जवळपास 6 महिने लागले. यात त्यांना कुटुंबाचीही साथ मिळाली. या चित्रपटात काम करणाऱ्या लोकांसाठी दादासाहेब फाळके यांच्या पत्नीनं स्वत: जेवण बनवलेल होते. हा चित्रपट 15 हजार रुपये खर्चून तयार झाला होता.

पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार : 'राजा हरिश्चंद्र' 1913 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मुंबईतील कोरोनेशन सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा दाखवण्यात आलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 'राजा हरिश्चंद्र' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला होता. त्यावेळी चित्रपट बनवणं खूप अवघड होते. तरीही त्यांनी या चित्रपटाची निर्मिती करून एक इतिहास रचला. दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक योगदानाबद्दल भारत सरकारने 1969 साली 'दादासाहेब फाळके' पुरस्कार सुरू केला. पहिला पुरस्कार अभिनेत्री देविका राणी चौधरी यांना देण्यात आला होता. यानंतर 1937 साली प्रदर्शित झालेला 'गंगावतरण' हा दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटालादेखील प्रेक्षकाची पसंती मिळाली नाही. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर फ्लॉप झाला. यानंतर त्यांनी चित्रपटांची निर्मिती करणे बंद केले. चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके यांनी देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी 16 फेब्रुवारी 1944 साली जगाचा निरोप घेतला.

दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 चे विजेते:

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान- जवान
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राणी मुखर्जी - मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - जवान
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- संदीप रेड्डी वंगा - अ‍ॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) - विकी कौशल- सॅम बहादूर
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)-करीना कपूर -जाने जान
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)- ट्वेल्थ फेल
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (समीक्षक) - अ‍ॅटली- जवान
  • नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता - बॉबी देओल - अ‍ॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर - जवान
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पार्श्वगायक ( श्रेणी पुरुष) - वरुण जैन, सचिन जिगर (जरा हटके जरा बचके से तेरे वास्ते)

हेही वाचा :

  1. प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ची तुलना 'ड्युन'शी करणाऱ्यांना नाग अश्विनने दिलं उत्तर - Kalki 2898 AD
  2. राकेश रोशनचा वयाच्या 74 व्या वर्षीही फिटनेस उत्साह पाहून तुम्हीही व्हाल चकित - Rakesh Rsohan Fitness
  3. मे 2024 मधील आगामी बॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरीजबद्दल जाणून घ्या, पाहा यादी - UPCOMING MOVIES AND WEB SERIES
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.