ETV Bharat / entertainment

एल्विश यादवनं यूट्यूबर सागर ठाकूरला मारहाण केल्यानंतर केला जारी व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 5:39 PM IST

Elvish Yadav Controversy: एल्विश यादवनं यूट्यूबर सागर ठाकूरला मारहाण केल्यानंतर एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत त्यानं दोन्ही बाजूची कहाणी जाणून घेण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे.

Elvish Yadav Controversy
एल्विश यादवचा वाद

मुंबई - Elvish Yadav Controversy: 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादवचं यूट्यूबर सागर ठाकूरबरोबर झालेल्या भांडणानंतर अनेकजण त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे. आता सोशल मीडियावर त्याच्या विरोधात 'अरेस्ट एल्विश' नावाचा ट्रेंडही सुरू झाला आहे. प्रत्येकजण त्याला दोषी समजत आहे. सागर ठाकूरन व्हिडीओ रिलीज केला आणि या प्रकरणी संपूर्ण माहिती सांगितली. आता यानंतर एल्विशनेही आपल्या बाजूनं संपूर्ण प्रकरणावर उजेड टाकला आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून एल्विश यादवनं म्हटलं, ''सागर ठाकूरनं तुम्हाला त्याची बाजू सांगून माझ्या विरोधात केलं आहे. परंतु मी एक एक करून सर्व गोष्टी समोर आणेल. तुम्ही दोन्ही बाजूची कहाणी जाणून घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे. 2020 पासून मी या सगळ्याचा सामना करत आहे. काही लोक एकत्र येत आहेत आणि माझ्या विरोधात आवाज उठवत आहेत. गेल्या 8 महिन्यांपासून मॅक्सटर्न (सागर ठाकूर ) हा मला त्रास देत आहे.''

मारपीठ केल्यानंतर एल्विश यादवनं केला व्हिडिओ जारी : एल्विशनं पुढं सांगितलं की, 'तुम्हाला सागर ठाकूरचे प्रत्येक ट्विट माझ्याविरुद्ध आढळेल. तो नेहमी मला धमकी देत असतो. जेव्हा मला तो शूटिंगदरम्यान भेटला, तेव्हा तो माझ्याबरोबर चांगला होता. मात्र त्यानंतर त्यानं मला पोक करणं सुरू केलं. यानंतर मी त्याला एकदा विचारलं होतं की, तु असं का कर आहेत, त्यानंतर तो मला अपशब्द बोलला. त्यानं मला फोटोवर म्हटलं की, तुझीच्या कुटुंबाला जाळून टाकेल. त्यानंतर मला राग आला. मी मॅक्सटर्नला विचारलं की तुझ लोकेशन दे मी तुला भेटायला येतो. त्यानंतर मी तिथे गेलो. सागर तिथे एकटा नव्हता, त्याच्याबरोबर आणखी चार जण होते. त्याच्या कुठल्याचं मित्रांनी त्याला वाचविले नाही. मात्र माझ्याबरोबर असणार लोकच मला अडवून त्याला मारू नको असं मला म्हणत होते.

एल्विश यादवचं स्पष्टीकरण : एल्विशनं पुढं म्हटलं की, ''जर तुम्हला आई बहिणीवर कोणी अपशब्द बोल असेल तुम्ही काय करणार हे तुम्ही मला सांगा. माझ्यावर मॅक्सटर्न 307 कलम लावण्यात मागणी केली आहे. 307 ही कलम मर्डरवर लागत असते. मी त्याचा हत्या करण्यासाठी गेले नव्हतो. आता सर्वजण माझ्या विरोधात सोशल मीडियावर बोलत आहेत. ज्यांना शिव्या द्यायच्या असेल ते मला देऊ शकता. मला काही फरक पडणार नाही. ज्यांना मला अनफॉलो करायचं असेल ते करू शकता. माझा संपूर्ण प्रशासनावर विश्वास आहे, ते योग्य कारवाई करेल. मी घरी गेल्यावर कारवाई करण्याचं पाहिल.'' आता या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून एल्विशला पाठिंबा देताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण त्याला याप्रकरणी वाईट कृत्य केल्याचं म्हणत आहेत.

हेही वाचा :

  1. हीरामंडीचे सकल बन गाणे : अमीर खुसरोंच्या कवितेला भन्साळींच्या संगीतानं दिले पुनर्जिवन
  2. साजिद नाडियाडवालाच्या 'सनकी' चित्रपटात दिसणार सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी
  3. सारा अली खान स्टारर 'ए वतन मेरे वतन' चित्रपटामधील 'कतरा कतरा' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.