ETV Bharat / entertainment

'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर बिग बॉस फेम यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 9:19 AM IST

Elvish Yadav Booked for Assaulting : सागर ठाकूर नावाच्या तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपावरुन यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुरुग्राममध्ये गुन्हा दाखल झालाय. एल्विश यादव एका तरुणाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता.

'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर बिग बॉस फेम यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल
'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर बिग बॉस फेम यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली Elvish Yadav Booked for Assaulting : मारहाणीच्या घटनेत यूट्यूबर एल्विश यादवला मोठा झटका बसलाय. याप्रकरणी हरियाणातील गुरुग्राममध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुरुग्रामच्या सेक्टर 53 पोलीस ठाण्यात हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एका व्हिडिओत एल्विश यादव एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसतोय. याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एल्विश यादवनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलंय.

एल्विशनं दिली जीवे मारण्याची धमकी : तक्रारदार सागर ठाकूरनं दिलेल्या तक्रारीनुसार, 'तो आणि एल्विश यादव 2021 पासून एकमेकांना ओळखतात. एल्विश यादव यानं शुक्रवारी त्याला भेटण्यास सांगितलं होतं आणि त्यानं त्या भेटीचं निमंत्रण स्वीकारलं होतं. मात्र जेव्हा एल्विश भेटायला दुकानात आला, तेव्हा त्यानं आणि त्याच्या 8-10 गुंडांनी मला मारहाण करण्यास आणि अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. ते सर्व नशेत होते. एल्विश यादवनं माझा पाठीचा कणा तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळं मी शारीरिकदृष्ट्या अपंग झालो,' असं सागरनं तक्रारीत म्हटलंय. तसंच जाण्यापूर्वी एल्विश यादवनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही त्यानं तक्रारीत नमूद केलंय.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल : सुमारे 5 मिनिटांच्या व्हायरल क्लिपमध्ये, बिग बॉस ओटीटी-2 चा विजेता एल्विश यादवनं मॉलच्या शोरुममध्ये येताच मुलाला वाईटरित्या मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ केल्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. ‘मी तुला जीवानं मारुन टाकीन’, असं तो म्हणत होता. सागर ठाकूर नावाच्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एल्विश यादवविरुद्ध आयपीसी कलम 147, 149, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. रेव्ह पार्टीत सापाचं विष वापरल्या प्रकरणी एल्विष यादवच्या अडचणीत वाढ, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात महत्त्वाची माहिती समोर
  2. Elvish Yadav rave party case : रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादवचा जबाब नोंद, गारुड्यांसमोर होणार चौकशी
  3. Elvish Yadav Snake Venom Case : एल्विश यादवची चौकशी करणाऱ्या पोलीस स्टेशन प्रभारीची उचलबांगडी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.