ETV Bharat / entertainment

'स्पिरिट' वादाच्या पार्श्वभूमीवर दीपिका पदुकोणचं आलं विधान समोर, वाचा सविस्तर...

दीपिका पदुकोण संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर तिचं एक विधान समोर आलं आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण (दीपिका पदुकोण (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : May 28, 2025 at 12:12 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोण निर्माता आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरिट' चित्रपटातून बाहेर पडली आहे. यानंतर संदीप रेड्डी वांगानं काल एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती, जी दीपिका पदुकोणवर निशाणा साधत होती. आता यानंतर हे प्रकरण अधिकच वाढलं असल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यामातून दोघांचे चाहते देखील एकमेकांशी भांडत आहेत. आता याप्रकरणी दीपिका पदुकोणचे एक विधान समोर आलं आहे. या विधानाबद्दल देखील सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. दीपिका पदुकोण काल संध्याकाळी २७ रोजी एका कार्यक्रमात पोहोचली. यादरम्यान तिला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील आव्हानांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले.

दीपिका पदुकोण आणि संदीप रेड्डी वांगाचा वाद : दीपिकानं याप्रकरणी म्हटलं, "मला वाटते की जे मला संतुलित ठेवते ते फक्त खरे आणि प्रामाणिक असणे आहे. जेव्हा जेव्हा मी कठीण परिस्थितींना तोंड देते, तेव्हा मला वाटते की, मी माझा अंतरात्माचा आवाज ऐकते आणि निर्णय घेते. त्या निर्णयावर स्थिर राहणं हे मला खरोखरच खूप शांती देते. यानंतर मला खूप चांगलं वाटते." दरम्यान मे २७, २०२५ संदीप रेड्डी वांगानं क्रिप्टिक एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये दीपिकाचं नाव न घेता संदीप रेड्डी वांगानं तिच्यावर खूप काही आरोप केले होते. आता क्रिप्टिक पोस्टशी संबंधित वादानंतर दीपिका पदुकोणचं हे विधान खूप व्हायरल झालं आहे.

दीपिका पदुकोणचं लूक : दीपिकानं या विधानादरम्यान संदीप रेड्डी वांगाचं नाव घेतले नाही किंवा त्याबद्दल काहीही सांगितलं नाही. मात्र चाहते आता दीपिकाच्या विधानाचा संबंध याप्रकरणाशी जोडत आहे. दरम्यान कार्यक्रमात, दीपिका लाल गाऊनमध्ये दिसली. तिनं यावर स्लीक-बॅक हेअरस्टाईल केली होती. शो-स्टॉपिंग डायमंड आणि नीलमणी नेकलेससह तिनं आपला लूक पूर्ण केला. आता तिचा बोल्ड लूक हा अनेकांना आवडला आहे. दीपिकानं तिच्या इंस्टाग्रामवर या ड्रेसमधील काही फोटोही शेअर केले आहेत. आता अनेकजण तिचे फोटो पाहूण कौतुक करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'तू कोण आहेस ते दाखवून दिलं आहेस', 'स्पिरिट'ची कहाणी लीक झाल्यावर दीपिका पदुकोणवर संदीप रेड्डी वांगानं साधला निशाना...
  2. प्रभासच्या 'स्पिरिट'साठी दीपिका पदुकोणनं भरमसाठ घेतली फी , कमाईत पती रणवीर सिंगला टाकले मागे
  3. फॅशनची राजधानी पॅरिसमध्ये अवतरली देखणी दीपिका पदुकोण, पण रणवीरची कमेंट झाली व्हायरल