प्रभासच्या 'स्पिरिट'साठी दीपिका पदुकोणनं भरमसाठ घेतली फी , कमाईत पती रणवीर सिंगला टाकले मागे
दीपिका पदुकोणला बॉलिवूडमध्ये हिट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत शाहरुख खानबरोबर केले तिचे चित्रपट हिट ठरले आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : May 14, 2025 at 1:38 PM IST
मुंबई : बॉलिवूडची हिट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणारी दीपिका पदुकोण सध्या तिच्या मातृत्वाचा काळ एन्जॉय करत आहे. या अभिनेत्रीनं एका मुलीला जन्म दिला आहे आणि तेव्हापासून ती कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. सध्या दीपिका 'स्पिरिट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अॅनिमल दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'स्पिरिट' चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत असणार आहे. याआधी या जोडीनं 'कल्की २८९८ एडी'सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. पुन्हा एकदा दीपिका एका साऊथ चित्रपटासाठी काम करणार आहे. रिपोर्ट्सनुसार दीपिकाला 'स्पिरिट' चित्रपटासाठी खूप मानधन मिळालं आहे.
दीपिका पदुकोणनं 'स्पिरिट'साठी किती घेतलं मानधान : 'स्पिरिट' चित्रपटासाठी रणवीर सिंगपेक्षा दीपिका पदुकोणला जास्त मानधन मिळाल्यानंतर ती सध्या चर्चेत आली आहे. रिपोर्ट्सनुसार,'स्पिरिट' चित्रपटासाठी दीपिकाची फी २० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. जर हे खरे मानलं गेलं, तर दीपिका भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. दीपिकाला आतापर्यंत तिच्या कोणत्याही चित्रपटासाठी इतके पैसे मिळालेले नाहीत. आता असं म्हटलं जात आहे की, रणवीर सिंग फीच्या बाबतीत त्याची पत्नी दीपिकापेक्षा मागे पडत आहे. रणवीरला 'सिंघम अगेन' चित्रपटासाठी १० कोटी रुपये मानधन मिळालं होतं. सध्या रणवीर 'धुरंधर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये रणवीरचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूडची हिट अभिनेत्री : अनेकदा असं दिसून आलं आहे की, शाहरुख खानच्या कोणताही चित्रपटात दीपिका पदुकोण असते. दीपिका शाहरुख खानसाठी खूप लकी आहे. त्याचे दीपिकाबरोबरचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. दीपिकानं 'ओम शांती ओम'पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. शाहरुख आणि दीपिकाच्या जोडीनं 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅपी न्यू इयर' आणि 'पठाण'सारखे हिट चित्रपट दिले आहेत. 'जवान'मध्ये दीपिकाचा कॅमिओ होता आणि हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला. 'जवान' हा बॉलिवूडमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आमिर खानचा दंगल हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा :

