ETV Bharat / entertainment

तब्बू, करीना, कृती स्टारर 'क्रू'ने रचला इतिहास, महिला केंद्रीत चित्रपट म्हणून जमवला आजवरचा सर्वाधिक गल्ला - Crew Creates History

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 5:26 PM IST

Crew Creates History : तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'क्रू'ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. हा हीस्ट कॉमेडी महिला केंद्रीत चित्रपट म्हणून आजवर सर्वाधिक ओपनिंग देणारा पहिला चित्रपट ठरला आहे.

Crew Creates History
'क्रू'ने रचला इतिहास

मुंबई - Crew Creates History : तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन स्टारर हिस्ट कॉमेडी 'क्रू' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग सुरुवात केली आहे. राजेश कृष्णन दिग्दर्शित या चित्रपटानं महिला केंद्रीत हिंदी चित्रपटासाठीची आतापर्यंतची सर्वाधिक ओपनिंग डे कमाई नोंदवली आहे. निर्मात्यांच्या मते, 'क्रू'ने त्याच्या सुरुवातीच्या दिवशी जगभरात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

'क्रू' या कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार प्रवास सुरू केला आहे. या चित्रपटात पुरुष स्टार्स नसताना केवळ अभिनेत्रींनी आपल्या खांद्यावर इतक्या मोठ्या चित्रपटाचं ओझं पेलून धरलं, थिएटर्समध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्याची किमया करुन दाखवली आणि महिला केंद्रीत ओपनिंग डेची सर्वाधिक कमाई नोंदवून इतिहास रचला. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिमानाने शेअर केलं की 'क्रू'ने त्याच्या पदार्पणाच्या दिवशी जगभरात 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सोशल मीडियावर बातमी जाहीर करून, निर्मात्यांनी 'क्रू'चा बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा उत्सव साजरा केला. महिलांच्या नेतृत्वाखालील हिंदी चित्रपटांमधील सर्वात मोठा सलामीवीर म्हणून आता या चित्रपटाचे नाव घेतलं जात आहे. जागतिक स्तरावर, 'क्रू'ने त्याच्या पहिल्याच दिवशी 20.07 कोटी रुपयांचा जोरदार गल्ला जमवला आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅसिल्कने नोंदवले की 'क्रू'ने देशांतर्गत बाजारात पहिल्या दिवशी 8.75 कोटी रुपयांची कमाई केली. सुरुवातीला 6.5 कोटी कमावण्याचा अंदाज होता. मात्र 'क्रू'ने सुरुवातीच्या दिवशी मजबूत कलेक्शनसह ही अपेक्षा ओलांडली.

'क्रू' चित्रपटात एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर तीन महिलांभोवती फिरणारी एक विनोदी कथा उलगडून दाखवली आहे. त्यांचे मार्ग एकमेकांत गुंतत असताना, त्या स्वतःला अनपेक्षित आणि हास्यास्पद परिस्थितीत अडकतात. याच्या परिणामी त्या गोंधळात टाकणारे साहस करतात. निधी मेहरा आणि मेहुल सुरी यांची कथा तीन नायिकांच्या मार्फत आकर्षक बनते. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील आघाडीच्या महिलांचे धाडसी वर्तन, प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

हेही वाचा -

  1. विजय देवेरकोंडा प्रेमविवाह करणार, पण...: व्हिडिओ व्हायरल - vijay deverakonda
  2. राजकुमार राव स्टारर श्रीकांत बोला बायोपिकचं नवं शीर्षक ठरलं, रिलीजची तारीखही जाहीर - Srikanth Bolla Biopic New Title
  3. चमकीला ट्रेलर लाँचमधील परफॉर्मन्स पाहून काही जण परिणीतीला म्हणाले, 'आज गाने की जिद्द ना करो' - Parineeti Chopra Singing
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.