ETV Bharat / entertainment

'दृश्यम'चा रिमेक न केल्याबद्दल कमल हासनविरोधात तक्रार दाखल! - Kamal Haasan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 4:49 PM IST

Kamal Haasan
कमल हासनविरोधात तक्रार दाखल!(Etv Bharat)

Complaint against Kamal Haasan : साऊथचा सुपरस्टार कमल हसन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन निर्मात्यांनी त्याच्यावर गुन्हा का दाखल केला? हे जाणून घेण्यासाठी वाचा.

चेन्नई - Complaint against Kamal Haasan : साऊथचा सुपरस्टार कमल हासनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिग्दर्शक आणि निर्माते लिंगास्वामी आणि सहनिर्माते सुभाष चंद्र बोस यांनी कमल हासनच्या विरोधात तमिळ चित्रपट निर्माता परिषदेत ही तक्रार दाखल केली आहे. निर्मात्याने कमल हासनवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 2015 मध्ये या दोन्ही निर्मात्यांच्या 'उत्तमा व्हिलन' चित्रपटात कमल हासन महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

'दृश्यम'चा रिमेक करण्यास नकार

'उत्तमा व्हिलन'च्या निर्मात्याने सुपरस्टारवर आरोप केला आहे की, त्यानं एकत्र चित्रपट करण्याचे आश्वासन दिले होते आणि नऊ वर्षांनंतरही त्यानं आपलं वचन पूर्ण केलं नाही. लिंगास्वामी यांनी 2 मे रोजी दिलेल्या निवेदनात कमल हासनने स्क्रिप्टमध्ये अनेक वेळा कसे बदल केले, त्यामुळे 'उत्तमा व्हिलन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती फ्लॉप ठरला हे सांगितले आहे.

दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत निर्मात्यांनी असेही म्हटले आहे की त्यांना कमल हासनबरोबर 'दृश्यम' या मल्याळम सुपरहिट चित्रपटाचा रिमेक बनवायचा होता. परंतु त्याने तो करण्यास नकार दिला आणि काही आठवड्यांनंतर, त्याने इतर बॅनरच्या बरोबर दुसरा चित्रपट सुरू केला.

निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, बॉक्स ऑफिसवर उत्तम व्हिलनच्या अपयशानंतर कमल हसनने त्याच्यासोबत 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये आणखी एक चित्रपट करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्याने भरपाई केली नाही आणि त्यामुळे निर्माते नुकसान सहन करत आहेत..

अशा परिस्थितीत सुभाषचंद्र बोस यांनी या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी निर्माता संघटनेची मदत मागितली आहे, मात्र अद्याप या तक्रारीवर परिषदेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'उत्तमा व्हिलन' चित्रपटाबद्दल सांगायचं तर, हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश अरविंद यांनी केलं होतं. ब्रेन ट्यूमरमुळे त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात असलेल्या अभिनेत्याची ही कथा आहे. त्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, अभिनेता त्याच्या चित्रपटाचे दिग्दर्शन घेण्यासाठी एका मार्गदर्शकाकडे जातो. या चित्रपटात कमल हासन, के विश्वनाथ, के बालचंदर, जयराम, अँड्र्यू जेरेमिया, पूजा कुमार, नासेर, पार्वती थिरुवुतू आणि उर्वशी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा -

  1. "चित्रा वाघ यांनी माफी मागितली नाहीतर, अब्रू नुकसानीचा दावा करणार" : अभिनेता राज नयानीचा इशारा - Raj Nayani warns
  2. देवेंद्रभाऊ, सरडेसुद्धा लाजून आत्महत्या करतील, सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
  3. भाजपाचा विजयोत्सव, चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचा जल्लोष; पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.