ETV Bharat / entertainment

क्रिकेट सेलिब्रिटी लीगमध्ये मुंबई हिरोजनं भोजपुरी दबंग्सवर केली मात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 5:20 PM IST

CCL 2024 : क्रिकेट सेलिब्रिटी लीगमध्ये मुंबई हिरोजनं भोजपूरी दबंग्सवर 1 धावांनी विजय मिळावला आहे. या क्रिकेट लीगचा अंतिम सोहळा 25 मार्चला संपणार आहे.

CCL 2024
सीसीएल 2024

मुंबई - CCL 2024 : क्रिकेट सेलिब्रिटी लीगच्या 10 व्या सीझनमध्ये 3 मार्च रोजी हिंदी चित्रपट अभिनेता रितेश देशमुखची टीम मुंबई हीरोज आणि भोजपूरी स्टार मनोज तिवारीच्या भोजपूरी दबंग्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर एक अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. भोजपूरी दबंग्सनं हा सामना 1 धावांनी हरला असला तरी 'रिंकिया के पापा' फेम अभिनेता मनोज तिवारीच्या टीमनं मुंबई हिरोजला मैदानात घाम फोडला होता. मुंबई हिरोजनं पहिली 10 ओव्हर खेळल्यानंतर 5 विकेट गमावल्या आणि भोजपूरी दबंग्सला 96 धावांचे लक्ष्य दिलं. यानंतर भोजपूरी दबंग्स 9 विकेट्स गमावून अवघ्या 90 धावा करू शकले.

सेलिब्रिटी क्रिकेट लीग : यानंतर पुढच्या फेरीत 10 ओवरमध्ये मुंबई हिरोजनं मैदानात उतरून भोजपूरी दबंग्सला 99 धावांचे मोठे लक्ष्य दिलं. भोजपूरी दबंग्स संघ 7 गडी गमावून केवळ 97 धावा करू शकले. भोजपूरी दबंग्स हा सामना पराभूत झाले. त्याचबरोबर या टी20 स्पर्धेत लागोपाठ तीन पराभवानंतर भोजपूरी दबंग्स स्पर्धेच्या प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. सेलिब्रिटी क्रिकेट लीग 23 फेब्रुवारीला मुंबईत सुरू झाली. आता हा क्रिकेट सोहळा 25 मार्चला संपेल. सेलिब्रिटी क्रिकेट लीगची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. पहिले दोन विजेतेपद साऊथ स्टार्स आर्य संघ चेन्नई राइनोजने जिंकले होते. यानंतर 2013 आणि 2014 मध्ये चंदन स्टार किच्चा सुदीपची टीम कर्नाटक बुलडोझर्सनं बाजी मारली होती. दरम्यान तेलुगू वॉरियर्सनं गेल्या काही वर्षीपासून सीसीएल ट्रॉफी आपल्या ताब्यात ठेवली आहे. तेलुगू वॉरियर्सनं 2015, 2016, 2017, 2023 या वर्षांमध्ये सलग चार वेळा अंतिम फेरी जिंकली आहे.

मुंबई हिरोज संघातील खेळाडू

रितेश देशमुख (कर्णधार)

सुहेल खान

आफताब शिवदासानी

साकिब सलीम

शब्बीर अहुलवालिया

राजा भेरवानी

शरद केळकर

अपूर्व लेखिया

समीर कोचर

सिद्धांत मुळे

फ्रेडी दारूवाला

वत्सल सेठ

मुदस्सीर जफर

नवदीप तोमर

CCL 2024

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

भोजपूरी दबंग खेळाडू

मनोज तिवारी (कर्णधार)

दिनेश लाल यादव (उपकर्णधार)

रवि किशन

प्रवेश लाल यादव

उदय तिवारी

राहुल सिंग

अजय शर्मा

अयाज खान

सुशील सिंग

अभय सिन्हा

खेसरीलाल यादव

जय यादव

सूर्या द्विवेदी

विकास सिंग

पवन सिंग

संतोष सिंग

अजय श्रीवास्तव

विक्रांतसिंग राजपूत

अनिल सम्राट

हेही वाचा :

  1. करण जोहर ते हृतिक रोशनपर्यंतचे सेलिब्रिटी अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये होते गैरहजर
  2. आई अंबेला समर्पित 'विश्वंभरी स्तुती'वर नीता अंबानीचा मंत्रमुग्ध करणार डान्स परफॉर्मन्स
  3. सारा अली स्टारर 'ऐ वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.