ETV Bharat / entertainment

बॉबी देओलला चाहत्यांसह 'या' स्टार्सनं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 6:25 PM IST

Bobby Deol Birthday : अभिनेता बॉबी देओलचा आज 55वा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Bobby Deol Birthday
बॉबी देओलचा वाढदिवस

मुंबई Bobby Deol Birthday : 'सोल्जर', 'बरसात', 'अपने' आणि 'अ‍ॅनिमल' यांसारख्या चित्रपटात काम करून हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता बॉबी देओल आज 27 जानेवारी रोजी आपला 55वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्याला भाऊ सनी देओल आणि बहीण ईशा देओल, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, सौरभ सचदेवा आणि दोन्ही पुतणे करण आणि राजवीर देओल यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'ॲनिमल' या चित्रपटात खलनायक अबरार हकची भूमिका साकारून तो जगभरात प्रसिद्ध झाला.

बॉबी देओलचा 55वा वाढदिवस : 'ॲनिमल' चित्रपटानंतर त्याची फॅन फॉलोइंग रातोरात वाढली असून आता त्याचे चाहते त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. दरम्यान साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं बॉबीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिनं लिहिलं, 'प्रत्येक क्षणी प्रेम करणाऱ्या बॉबी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' याशिवाय ईशा देओलनं तिच्या पोस्टवर लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ. मला खूप अभिमान आहे तुझा." दरम्यान, करण देओलनं काकासोबतचा फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलं, ''तुम्ही अशीच लोकांना प्रेरणा देत राहा आणि तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी राहो.'' दुसरीकडे राजवीर देओलनं काकासाठी पोस्टमध्ये लिहिलं, ''वाढदिवसाच्या शुभेच्छा काका, तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे.''

चाहत्यांनी केला वाढदिवस साजरा : सोशल मीडियावर बॉबीच्या चाहत्यांमध्ये त्याला शुभेच्छा देण्याची स्पर्धा लागली आहे. बॉबीचे चाहते त्याच्यासाठी एक मोठा केक घेऊन आले आहेत आणि त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बॉबीसाठी आणलेला केक पाच मजली आहे. या केकवर बॉबी देओलचे अनेक फोटो आहेत. यावर 'हॅपी बर्थडे लॉर्ड बॉबी देओल' असंही लिहिलं आहे. दरम्यान बॉबी त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानत आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बॉबीनं निळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. यावर त्यानं काळ्या रंगाची टोपी घातली आहे. त्याचे चाहते त्याच्या गळ्यात मोठा हार घालताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण त्याच्यासोबत फोटो काढत आहेत. यावेळी एका महिलेनं बॉबीच्या गालावर किस केलं. त्याचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

  1. आमिर खानची मुलगी आयरा खाननं कुटुंबासोबतचे लग्नातील न पाहिलेले फोटो केले शेअर
  2. 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीचा फर्स्ट लूक झाला व्हायरल
  3. ओटीटीवर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर झाले 'हे' चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.