ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 17' हारल्यानंतर अंकिता लोखंडेनं शेअर केली पोस्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 5:21 PM IST

Ankita Lokhande and Bigg Boss 17 : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17' हारल्यानंतर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं अभिनेता सलमान खानचे आभार मानले आहे.

Ankita Lokhande and Bigg Boss 17
अंकिता लोखंडे आणि बिग बॉस १७

मुंबई - Ankita Lokhande and Bigg Boss 17 : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेनं 'बिग बॉस 17'मध्ये प्रवेश केल्यानंतर ती कायम चर्चेत राहिली. तिच्यासोबत तिचा बिझनेसमन पती विकी जैननं देखील बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. अंकितानं बिग बॉसमध्ये खूप दुःखद प्रवास केला. तिचे आणि पती विकी जैनचे या घरात जोरदार भांडणे होत होती. आता 'बिग बॉस 17' हा शो संपला आहे. या शोचा विजेता मुनावर फारुकी झाला आहे. अंकिता लोखंडे शोच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली. ती टॉप 3 मध्ये येऊ शकली नाही. अंकिताला 'बिग बॉस 17' मध्ये हरवल्याचे चांगले वाटलेले नाही .

अंकिता लोखंडेनं शेअर केली पोस्ट : तिनं या शोनंतर म्हणजेच आज 29 जानेवारी रोजी पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, ''एक असा प्रवास जो नेहमी लक्षात राहील. तुमच्या मायेच्या शब्दांबद्दल धन्यवाद.'' अंकिताच्या या पोस्टवर तिचे अनेक चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. याशिवाय अंकितानं तिला दिलेल्या संधीसाठी बिग बॉस निर्मात्यांचे आभार मानले आहेत. टॉप 3 च्या शर्यतीत, मुनावर फारुकी, अभिनेत्री मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार होते. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर मन्नाराची हकालपट्टी झाली. यानंतर अभिषेक आणि मुनावर यांच्यात विजेतेपदाचा सामना झाला.

मुनावर फारुकी झाला विजयी : या सामान्यात मुनावर फारुकी विजयी झाला. मुनावरच्या चाहत्यांनी त्याला या शो दरम्यान खूप पाठिंबा दिला. अनेकांना अंकिता लोखंडे विजयी होणार असल्याचं वाटत होतं. अंकिताची चाहतावर्ग खूप मोठा आहे, तिला अनेकांनी या शोदरम्यान पाठिंबा दिला आहे. 'बिग बॉस 17'मध्ये अनेकदा अंकिता आणि विकीची आई त्यांना समजविण्यासाठी आल्या आहेत.अंकिताला हा शो जिंकण्याची अपेक्षा होती. फिनाले पूर्वी तिला पती विकी जैननं देखील पाठिंबा दिला होता. त्यानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यामध्ये त्यानं जनतेला अंकिताला वोट करण्याचं आव्हान केलं होतं.

हेही वाचा :

  1. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी 'बरीड ट्रुथ' वेब सीरीजचं पहिलं पोस्टर रिलीज
  2. पहिल्या लाइव्ह सिंगिंग परफॉर्मन्सनंतर परिणीती चोप्रा झाली भावूक
  3. फिल्मफेअर पुरस्कारामध्ये 'ॲनिमल' आणि 'ट्वेल्थ फेल'चा बोलबाला ; पाहा यादी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.