ETV Bharat / entertainment

Allu Arjun : अल्लू अर्जुननं इन्स्टाग्रामवर 25 दशलक्ष फॉलोअर्स झाल्यानंतर मानले चाहत्यांचे आभार - Allu Arjun

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 11:58 AM IST

Allu Arjun : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 25 मिलियन फॅन्स आहेत. आता कुठल्या साऊथ अभिनेत्याचे किती इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत हे जाणून घेऊया.

Allu Arjun
अल्लू अर्जुन

मुंबई - Allu Arjun : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2'मुळे चर्चेत आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा टप्पा सुरू आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेकजण वाट पाहत आहेत. दरम्यान 20 मार्च रोजी रश्मिका मंदान्ना 'पुष्पा 2' चित्रपटातील तिचे शेवटचे शेड्यूल पूर्ण करताना दिसली. हा चित्रपट याच वर्षी 15 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' रिलीज होत आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटामध्ये रुपेरी पडद्यावर टक्कर पाहायला मिळेल. या चित्रपटाकडून अल्लू अर्जुनला खूप अपेक्षा आहेत.

अल्लू अर्जुननं चाहत्याचे मानले आभार : अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग अजय देवगणपेक्षा जास्त आहे. अजयचे सोशल मीडियावर 11.5 दशलक्ष चाहते आहेत तर अल्लूचे इन्स्टाग्रामवर 25 दशलक्ष झाले आहेत. अल्लू अर्जुनचे 20 मार्च रोजी इंस्टाग्रामवर 25 दशलक्ष चाहते झाले आहेत. दरम्यान त्यानं सोशल मीडियावर ओक पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''थँक्यू ग्रेटफुल फॉरएवर'' या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. याशिवाय त्याला त्याच्या आगामी चित्रपट 'पुष्पा 2'साठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर कोणत्या स्टार्सचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत ते जाणून घेऊया.

कोणत्या साऊथ स्टारचे किती इन्स्टा फॉलोअर्स आहेत?

यश - 13.5 दशलक्ष

महेश बाबू - 13.3 दशलक्ष

प्रभास - 11.7 दशलक्ष

विजय - 10.08 दशलक्ष

सूर्या- 9 दशलक्ष

नानी - 7.3 दशलक्ष

जूनियर एनटीआर - 7.3 दशलक्ष

धनुष - 7.3 दशलक्ष

कमल हसन - 3.7 दशलक्ष

विक्रम - 2.5 दशलक्ष

'पुष्पा 2' चित्रपटाचं बजेट : आता यादीवरून समजून येते की, अल्लू अर्जुनचे इन्स्टा फॉलोअर्स खूप आहेत. त्यामुळे त्याचा 'पुष्पा 2' चित्रपट जबरदस्त बॉक्स ऑफिसवर हिट होईल असा अंदाज लावू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, 'पुष्पा 2' चित्रपट अंदाजे 500 कोटींच्या बजेटमध्ये बनविला गेला आहे.

हेही वाचा :

  1. Pulkit and Kriti Kharbanda : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नानंतर मुंबईला परतले, विमानतळावर केले मिठाई वाटप
  2. Baaghi 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'बागी' फ्रेंचाइजीचा चौथा भाग येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
  3. Jyothika thanks Shaitan team : "शैतान हा एक प्रवास होता" म्हणत, ज्योतिकाने 'शैतान'च्या रीलसह मानले टीमचे आभार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.