ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 द रुल'चा टीझर यूट्यूबवर नंबर एकवर ट्रेंड - PUSHPA 2 THE RULE

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 5:12 PM IST

Pushpa 2 The Rule Teaser : अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी 'पुष्पा 2 द रुल'चा टीझर प्रदर्शित केला होता. आता या चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर नंबर एकवर ट्रेंड करत आहे.

Pushpa 2 The Rule Teaser
पुष्पा 2 द रुलचा टीझर

मुंबई- Pushpa 2 The Rule Teaser : अभिनेता अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या टीझरमधील अल्लू अर्जुनची शैली ही खूपच हटके आहे. आता सोशल मीडियावर 'पुष्पा: द रुल'चा टीझर ट्रेंड करत आहे. 'पुष्पा: द रुल'च्या टीझरला यूट्यूबवर अनेकजण पाहात आहेत. दरम्यान आज 9 एप्रिल रोजी माइथ्री मूवी मेकर्सनं आपल्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर 'पुष्पा: द रुल'चं नवीन पोस्टर जारी करून एक अपडेट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ''हे पुष्पराजचे जग आणि रहस्य आहे, आम्ही फक्त त्यात जगत आहोत.''

'पुष्पा 2 द रुल' चित्रपटाचा टीझर हिट : 'पुष्पा 2 द रुल' टीझर 85 दशलक्ष रिअल टाइम व्ह्यू आणि 1.2 दशलक्ष लाईक्ससह यूट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत असल्यामुळे अनेकजण खूश आहेत. अल्लूचे अनेक चाहते सोशल मीडियावर 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटासंबंधित माहिती शेअर करताना सध्या दिसत आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल अशी अपेक्षा आता अनेकजण करत आहे. याशिवाय अल्लू अर्जुनला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'पुष्पा 2 द रुल' चित्रपटाची स्टारकास्ट : 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, फहाद फाजिल, विजय सेतुपती, प्रियामणी, अनसुया भारद्वाज, श्रीतेज, दिवी वध्या, जगपती बाबू, प्रकाश राज, सुनील आणि इतर कलाकार दिसणार आहेत. रश्मिका मंदान्ना 'पुष्पा'ची पत्नी 'श्रीवल्ली'च्या भूमिकेत दिसणार आहे. फहद फासिल पुन्हा एकदा एसपी भंवर सिंग शेकावतच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय जगपती बाबू चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. दरम्यान अल्लू अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे 'आयकॉन' आणि 'एए 22' असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.

हेही वाचा :

  1. 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट पुढे ढकलली ; अक्षयसह टायगरनं शेअर केला व्हिडिओ - bade miyan chote miyan release date
  2. गुढीपाडवाच्या विशेष प्रसंगी 'या' मराठी कलाकारांनी दिल्या चाहत्यांना शुभेच्छा - marathi celebs and Gudi padwa
  3. 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी रणबीर कपूरचा फिटनेस प्रशिक्षण घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - ranbir kapoor fitness training
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.