UPSC परीक्षा 2023 चा निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम, निकाल पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा - UPSC 2023 Result Declared

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 4:10 PM IST

Updated : Apr 17, 2024, 7:18 PM IST

UPSC 2023 Result Declared

UPSC 2023 Result Declared : लोकसेवा आयोगानं 2023 मध्ये विविध पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केलाय. या परीक्षेत लखनौचा आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम आला असून, अनिमेष प्रधाननं द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

नवी दिल्ली UPSC 2023 Result Declared : लोकसेवा आयोगानं (UPSC) मंगळवारी नागरी सेवा परीक्षा-2023 चा निकाल जाहीर केलाय. यामध्ये लखनौच्या आदित्य श्रीवास्तवनं देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे, तर अनिमेष प्रधाननं दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसंच डोनुरू अनन्या रेड्डी ही देशात तिसरी आली आहे. मुख्य परीक्षेतील सर्व यशस्वी उमेदवारांची यादी UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नागरी सेवा परीक्षा-2023 मध्ये 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक मिळवलेल्या आदित्यनं लखनौच्या अलीगंज येथील सिटी मॉन्टेसरी शाळेत शिक्षण घेतलंय. आदित्यचे वडील अजय श्रीवास्तव कॅगमध्ये ऑडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्याची आई गृहिणी आहे.

1 हजार 16 उमेदवार UPSC उत्तीर्ण : यावर्षी यूपीएससी परीक्षेत 1 हजार 16 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 347 उमेदवार खुल्या प्रवर्गातील, 116 उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील, 303 उमेदवार ओबीसी प्रवर्गातील, 165 उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील तसंच 86 उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. गेल्या वर्षी हे गुणोत्तर खुला प्रवर्ग ३४५, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग २८, ओबीसी ५२, अनुसूचित जाती ५ तसंच अनुसूचित जमाती ४ होतं.

2021-2022 मध्ये मुलींनी पटकावला अव्वल क्रमांक : 2021 च्या परीक्षेत श्रुती शर्मानं देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. तसंच अंकिता अग्रवाल, जेमिनी सिंगला यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला होता. 2022 मध्ये झालेल्या परीक्षांमध्येही मुलींनी बाजी मारली होती. यावेळी इशिता किशोरनं देशात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. तसंच गरिमा लोहियालानं देशात दुसरा, उमा हराथीला देशात तिसरा, स्मृती मिश्रानं चौथा क्रमांक पटकावला होता.

असा पाहा UPSC चा निकाल : upsc.gov.in या वेबसाइटवरील UPSC CSE निकाल लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लॉगिन करून तुमचा तपशील भरा. त्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तसंच तुम्ही इथेच निकालपत्र डाउनलोड करू शकता.

हे वाचलंत का :

  1. UPSC Success Story : संसाराचा गाडा पाठीशी असताना पोलीस अधिकाऱ्याच्या सूनबाईचं युपीएससीत यश
  2. UPSC Result 2022 : सोलापुरातील रेल्वे अधिकारी भावना एच एस देशात 55 व्या रँकने उत्तीर्ण; कर्नाटकात नंबर वन
  3. UPSC Maharashtra Topper : ठाण्याची डॉ. कश्मिरा राज्यात पहिली, अधिकारी बनून देशसेवा करण्याची इच्छा
Last Updated :Apr 17, 2024, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.