ETV Bharat / bharat

'या' राशीच्या व्यक्तींना सरकारी कामात यश मिळेल; वाचा राशीभविष्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 6:13 AM IST

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 26 जानेवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

मेष : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे व जलाशया पासून दूर राहावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.

वृषभ : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

मिथुन : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. मित्र व शुभेच्छुकांचा सहवास लाभल्याने मनास आनंद मिळेल.

कर्क : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. वर्तनात संयमित व विवेकी राहावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. संतती कडून चांगली बातमी मिळेल.

तूळ : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. माते कडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.

वृश्चिक : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. . वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो महत्वाचे निर्णय टाळावेत. खर्च वाढेल. एखादा प्रवास ठरवाल.

धनू : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. आजारा वरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणे हितावह राहील. वाणी व वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहील. अती संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैसा अधिक खर्च होईल. शक्य तितके अवैध कामा पासून दूर राहावे. मनाला शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

मकर : 26 जानेवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. संततीच्या अभ्यासा विषयी चिंता निर्माण होईल. कामात यश मिळेल. विचार अस्थिर व द्विधा मनःस्थिती होईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. तब्बेत उत्तम राहील. वाहन सौख्य व सन्मान प्राप्ती होईल. नववस्त्रांची खरेदी होईल. एखादा मनोरंजक प्रवास घडेल.

कुंभ : 26 जानेवारी 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मीन : 26 जानेवारी 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्या पासून शक्यतो दूर राहावे. मानसिक संतुलन सांभाळावे लागेल.

हेही वाचा :

  1. 'या' राशीच्या व्यक्ती प्रवासाचे बेत आखतील; वाचा राशीभविष्य
  2. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.