ETV Bharat / bharat

'आप' खासदार संजय सिंह यांना 'सर्वोच्च' न्यायालयाचा झटका, पंतप्रधान मोदींच्या पदवी प्रकरणी याचिका फेटाळली - PM Modi Degree Remarks

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 7:31 PM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

PM Modi Degree Remarks : पंतप्रधान नरेंद्रे मोदींच्या शैक्षणिक पदवीबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या मानहानीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. (MP Sanjay Singh) हा युक्तिवाद न्यायदंडाधिकारी न्यायालयात करणं योग्य ठरेल असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली : PM Modi Degree Remarks : गुजरात विद्यापीठ मानहानी प्रकरणात संजय सिंह यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. संजय सिंह यांनी याचिका दाखल करून गुजरात येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेला रद्द करण्याची मागणी केली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भात सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून हा खटला सुरू झाला होता. गुजरात विद्यापीठाने पंतप्रधान मोदी यांच्या पदवीसंदर्भात संजय सिंह यांनी गुजरात विद्यापीठावर केलेल्या वक्तव्यावरून मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामुळे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सिंह यांना वारंवार समन्स पाठवलं होतं. (Prime Minister Narendra Modi) त्यामुळे हा खटला रद्द करण्यासाठी सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळली आहे.

खोटी पदवी बनवल्याचंही कुठं म्हटलं गेलेलं नाही : या याचिकेवर झालेल्या सुनावणीत संजय सिंह यांच्याकडून युक्तिवाद करणाऱ्या रेबेका जॉन यांनी म्हटलं की, संजय सिंह यांनी जे वक्तव्य गुजरात विद्यापीठासंदर्भात केलं, त्यात मानहानीसारखं काहीही नव्हतं. व्हिडीओवरूनही हे स्पष्ट होतं की त्यात विद्यापीठाचा अवमान होईल, असं काहीही बोललं गेलेलं नाही. गुजरात विद्यापीठाने खोटी पदवी बनवल्याचंही कुठं म्हटलं गेलेलं नाही, असा युक्तिवाद सिंह यांच्यातर्फे करण्यात आला. (Supreme Court) पण, हा युक्तिवाद न्यायदंडाधिकारी न्यायालयात करणं योग्य ठरेल असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

समन्स रद्द करण्याची मागणी : पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेवर टिप्पणी केल्याप्रकरणी संजय सिंह यांनी गुजरात उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचं समन्स रद्द करण्याची मागणी केली होती. मानहानीच्या प्रकरणात संजय सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जारी केलेले समन्स रद्द करण्याची मागणी करणारी याचिका (दि. 16 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. गुजरातमधील मेट्रोपॉलिटन कोर्टाने केजरीवाल आणि संजय सिंह यांना पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पदवींबाबत व्यंगात्मक आणि अपमानास्पद विधान केल्याबद्दल मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले होते. याप्रकरणी गुजरात विद्यापीठाने फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.

हेही वाचा :

1 हिंदू विवाहांमध्ये कन्यादान बंधनकारक विधी नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी - Allahabad High Court Lucknow Bench

2 गुढीपाडव्याच्या दिवशी होणार मविआची संयुक्त पत्रकार परिषद, आघाडीत बिघाडी नसल्याचा संजय राऊतांचा दावा - Lok Sabha Election 2024

3 लोकसभेच्या रणधुमाळीत कर्नाटकात एका घरातून 7 कोटी रुपयांसह दागिने जप्त, पोलिसांकडून चौकशी सुरू - crores cash jewellery seized

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.