ETV Bharat / bharat

'ही लोकशाहीची हत्या'; चंदीगड महापौर निवडणुकीच्या खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश संतापले!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 5:58 PM IST

Supreme Court on Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पीठासीन अधिकाऱ्याचा व्हायरल व्हिडिओ पाहून सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड संतापले. त्यांनी नव्या महापौरांच कामकाज स्थगित केलंय.

Supreme Court on Chandigarh Mayor Election
Supreme Court on Chandigarh Mayor Election

नवी दिल्ली Supreme Court on Chandigarh Mayor Election : चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मनोजकुमार सोनकर यांच्या विजयाला आम आदमी पार्टीनं आव्हान दिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं आज मूळ रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले. तसंच रिटर्निंग ऑफिसरनं (आरओ) मतपत्रिकांमध्ये विपर्यास केल्याचं स्पष्ट झालंय. ही लोकशाहीची हत्या आणि लोकशाहीची थट्टा करण्यासारखं आहे. याची आम्हाला भीती वाटते, असं म्हणत सरन्यायाधीशांनी यावर संताप व्यक्त केलाय.

महापालिकेची पहिली सभा स्थगित : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठात चंदीगड महापौर निवडणुकीला आव्हान देणाऱ्या कुलदीप कुमार यांच्या याचिकेवर नोटीस बजावलीय. तसंच चंदीगड महापालिकेची 7 फेब्रुवारी रोजी होणारी पहिली सभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून संपूर्ण निवडणूक रेकॉर्ड जप्त करा : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं सुनावणी दरम्यान सांगितलं की, "चंदीगड महानगरपालिका निवडणुकीचं संपूर्ण रेकॉर्ड उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडून जप्त करावं. तसंच मतपत्रिका, व्हिडिओग्राफी देखील जपून ठेवावी, अशी नोटीस रिटर्निंग ऑफिसरला बजावण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयानं चंदीगडच्या महापौर निवडीप्रकरणी आज सुनावणी घेतली. आजच्या सुनावणीनंतर या प्रकरणाची सुनावणी 12 फेब्रुवारीपर्यंत पुढं ढकलण्यात आलीय.

ही तर लोकशाहीची हत्या : सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश म्हणाले की, "त्यांनी (पीठासीन अधिकारी) मतपत्रिका खराब केल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे." पीठासीन अधिकाऱ्याच्या कॅमेऱ्यात बघितल्यावर सरन्यायाधीशांनी कॅमेऱ्यात का बघत आहात असं विचारलं. हे रिटर्निंग ऑफिसचे वर्तन आहे का? कृपया रिटर्निंग ऑफिसरला सांगा की, सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. ईव्हीएम कंपनीच्या संचालकपदी भाजपाचे 4 डायरेक्टर; संजय राऊतांचा मोठा दावा
  2. "वही होता है, जो मंजूरे नरेंद्र मोदी होता है", प्रियंका चतुर्वेदींची शिवसेना निकालावरून खरपूस टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.