ETV Bharat / bharat

दंतेवाड्यात अपघातानं सुटली बंदुकीतून गोळी, एका जवानाचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Soldier Dead in Accidental Firing

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 11:59 AM IST

Soldier Dead in Accidental Firing
संग्रहित छायाचित्र

Soldier Dead in Accidental Firing : दंतेवाडा परिसरात नक्षलवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाचे जवान गस्तीवर गेले होते. यावेळी अपघातानं गोळी सुटून दोन जवान गंभीर जखमी झाले. यातील एका जवानाचा मृत्यू झाला, तर दुसरा जवान गंभीर जखमी आहे.

रायपूर Soldier Dead in Accidental Firing : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून मोठी काळजी घेण्यात येत आहे. दंतेवाड्यातील नक्षलग्रस्त नारायणपूर इथं डीआरजी पथक शोधमोहीम राबवताना अपघातानं गोळी सुटून एका जवानाचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक जवान जखमी झाला आहे. अपघातानं गोळीबार घडल्यानंतर या जखमी जवानाला तत्काळ एयरलिफ्ट करण्यात आलं. त्याच्यावर रायपूरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.

गस्त सुरु असताना अपघातानं गोळी सुटून मृत्यू : दंतेवाडा जिल्ह्यातील वरसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा जवान गस्त घालत होते. यावेळी हंदवाडा आणि हितवाडा परिसरात सशस्त्र नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलातील जवानांना मिळाली. त्यामुळे 24 एप्रिलला डीआरजी आणि बस्तर फायटर दंतेवाडा यांचं संयुक्त पथक दंतेवाडा आणि नारायणपूरच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांचा शोध घेत होतं. यावेळी मोहीमेत चुकून गोळी लागल्यानं दंतेवाडाचे दोन जवान जखमी झाले. त्यातील एका जवानाला वीरमरण आलं, तर दुसऱ्या जवानावर उपचार सुरू आहेत. या जवानांना तत्काळ एयरलिफ्ट करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली.

अतिरक्तस्राव झाल्यानं जवानाचा मृत्यू : नारायणपूर इथं नक्षलवाद्यांच्या शोध मोहिमेत चुकून गोळी लागल्यानं दोन जवान जखमी झाले होते. यात जखमी हवालदार जोगराज कर्मा यांचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला. तर दुसरा जखमी जवान परशुराम आलमी याला तत्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला एयरलिफ्ट करुन रायपूरला हलवण्यात आलं. या जवानाचा प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीही बस्तर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी 11 एप्रिलला विजापूरमध्ये कर्तव्यावर असलेल्या UBGL फुटून एका जवानाला वीरमरण आलं होतं. देवेंद्र कुमार असं या जवानाचं नाव होतं.

हेही वाचा :

  1. नक्षलवाद्यांनी पुलाखाली पेरला विध्वसंकारी आयईडी, जीवाची बाजी लावून जवानांनी केला निकामी; पाहा व्हिडिओ
  2. Dantewada attack : दंतेवाडा हल्ल्याची जबाबदारी पीएलजीए या नक्षलवादी संघटनेने घेतली
  3. Dantewada Naxalite Attack Video: दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर, 10 जवान झाले शहीद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.