ETV Bharat / bharat

Pashupati Paras On NDA Alliance : केंद्रीय मंत्री पशुपती पारस जागा वाटपावरुन नाराज; केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 2:11 PM IST

Pashupati Paras On NDA Alliance
केंद्रीय मंत्री पशुपती पारस आणि पंतप्रधान मोदी

Pashupati Paras On NDA Alliance : बिहारचं राजकारण सध्या चांगलच तापलं आहे. केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे नेते पशुपती पारस नाराज असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. नाराज असलेले पशुपती पारस एनडीए सोडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

पाटणा Pashupati Paras On NDA Alliance : लोकसभा निवडणूक 2024 जागा वाटपाचा तिढा "इंडिया' आघाडी आणि महायुतीमध्येही अद्याप सुटला नाही. एनडीएच्या घटक पक्षांना भाजपा जागा सोडेल अशी अपेक्षा लागून आहे. मात्र भाजपानं जागा न सोडल्यानं बिहारमध्ये राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाला एकही जागा न मिळाल्याने केंद्रीय मंत्री पशुपती पारस नाराज असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री पशुपती पारस मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री पशुपती पारस हे एनडीएची साथ सोडण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

आम्ही अद्यापही कोणाशीही बोललो नाही. मात्र मी हाजीपूरमधून लोकसभा निवडणूक 2024 लढणार आहे. आमचे सर्व विद्यमान खासदार आपापल्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. हा आमचा आणि आमच्या पक्षाचा निर्णय आहे. आम्हाला योग्य सन्मान दिला नाही तर आमचा पक्ष कोणाशीही युती करायला मोकळा आहे. - पशुपती पारस, राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष

केंद्रीय मंत्री पशुपती पारस नाराज : केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. मात्र बिहारमध्ये भाजपानं त्यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाला एकही जागा सोडली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री पशुपती पारस हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. केंद्रीय मंत्री पशुपती पारस हे एनडीए सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चिराग पासवान यांना पाच जागा : केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या पक्षाला भाजपानं एकही जागा सोडली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री पशुपती पारस हे एनडीएतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसरीकडं भाजपानं रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या पक्षाला पाच जागा सोडल्या आहेत. हाजीपूरच्या जागेवर केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी दावा ठोकला होता. मात्र ती जागाही चिराग पासवान यांना भाजपानं सोडली आहे. त्यामुळे मंत्री पशुपती पारस प्रचंड नाराज आहेत.

आरजेडीच्या संपर्कात पारस गट? : एनडीएमध्ये एकही जागा मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष आरजेडीच्या संपर्कात असल्याची चर्चा जोर धरत आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षानं युतीसाठी सर्व दरवाजे खुले असतील असं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय मंत्री पशुपती पारस हे आरजेडी नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याचा दावा राजकीय पक्ष करत आहेत. आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष लवकरच 'इंडिया' आघाडीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

  1. Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक : जाहीरनाम्यावर होणार चर्चा?
  2. Bharat Jodo Nyay Yatra : इंडिया आघाडीला होणार का राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा फायदा ? जाणून घ्या काय आहेत कारणं ?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.