ETV Bharat / bharat

फॉरेन्सिक विभागाकडून स्पॅनिश महिलेवरील बलात्कार प्रकरणाची चौकशी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 9:47 PM IST

Spanish Woman Gang Rape Case : दुमका येथील एका स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी रांची येथील फॉरेन्सिक आणि सीआयडी पथक घटनास्थळी पोहोचलं. या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून काही पुरावे गोळा केले. महिला आयोगाच्या सदस्याने पीडितेची भेट घेतली आहे.

स्पॅनिश महिलेवरील बलात्कार प्रकरणाची चौकशी
स्पॅनिश महिलेवरील बलात्कार प्रकरणाची चौकशी

व्हिडिओ

नवी दिल्ली : Spanish Woman Gang Rape Case : रांचीच्या फॉरेन्सिक आणि सीआयडी टीमने स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनास्थळाची पाहणी केली आहे. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक ते पुरावे गोळा केले आहेत. येथे काल शनिवार (दि. 2 मार्च)रोजी रात्री राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या ममता कुमारी यांनी पीडितेची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

फॉरेन्सिक तपास पथक पोहोचले घटनास्थळी : दुमका जिल्ह्यातील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरमहाट गावाजवळ स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. फॉरेन्सिक तपास आणि रांची येथील सीआयडी पथकाने घटनास्थळाची कसून तपासणी केली आहे. अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर तेथे उपस्थित असलेले काही पुरावेही गोळा केले आहेत. मात्र, यामध्ये काय पुरावे मिळाले याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी : काल रात्री राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या ममता कुमारी दुमका यांनी पीडितेशी बोलून घटनेची माहिती घेतली. पुढे, त्या म्हणाल्या की ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामुळे येथील कायदा आणि सुव्यवस्थेचा पर्दाफाश झाला आहे. ममता कुमारी म्हणाल्या की, यात जो कोणी दोषी असेल त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी.

तीन आरोपींना अटक : दुमकाच्या हंसदिहा मार्केटजवळ सात तरुणांनी एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. तरूणांनी महिला आणि तिच्या पतीलाही मारहाण करून 10 हजार रुपये लुटून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेची पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत तीन तरुणांना अटक केली. त्यामध्ये ताब्यात घेतलेल्या तरुणांनी या घटनेची कबूली दिली आहे. येथील पोलीस अधिकारी पितांबर सिंह खेरवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा :

1 पहिल्याच यादीत भाजपाचा हिरमोड; भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार

2 तिहेरी हत्याकांडानं चंद्रपूर हादरलं; नराधमानं पत्नीसह केली दोन मुलींची हत्या

3 पंतप्रधान मोदींवर विश्वास म्हणजे विश्वासघाताची हमी-राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.